वाळूजमध्ये तरुणावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:50 IST2019-03-03T23:49:55+5:302019-03-03T23:50:06+5:30
मुलीला फोनवर बोलण्याच्या कारणावरून २२ वर्षीय तरुणावर मित्रांनीच चाकूहल्ला केल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वाळूजच्या अविनाश कॉलनीत घडली.

वाळूजमध्ये तरुणावर चाकूहल्ला
वाळूज महानगर : मुलीला फोनवर बोलण्याच्या कारणावरून २२ वर्षीय तरुणावर मित्रांनीच चाकूहल्ला केल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वाळूजच्या अविनाश कॉलनीत घडली. वैभव सदाशिव गडदे, असे जखमी तरुणाचे नाव आहे.
वैभव गडदे (२२) हा आई-वडिलांसह बकवालनगर येथे वास्तव्यास असून, तो माजी सरंपच योगेश दळवी यांच्याकडे आॅफिस बॉय म्हणून काम करतो. रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वैभवला त्याच्या मित्रांनी अविनाश कॉलनी येथे बोलावून घेतले. त्यानंतर वैभव व त्याच्या मित्रांत मुलीला फोनवर बोलण्यावरून वाद झाला. यात त्याच्या मित्रासह अन्य साथीदारांनी वैभववर चाकूहल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान हल्लेखोरांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.