पत्नीसह सासू व मेव्हणीवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:32 IST2019-01-07T23:32:46+5:302019-01-07T23:32:58+5:30

वडगाव कोल्हाटी येथे पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून पत्नी, सासू व मेव्हणीवर चाकूने हल्ला करणाऱ्या जावयाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakahala on mother-in-law and mother-in-law with wife | पत्नीसह सासू व मेव्हणीवर चाकूहल्ला

पत्नीसह सासू व मेव्हणीवर चाकूहल्ला

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून पत्नी, सासू व मेव्हणीवर चाकूने हल्ला करणाऱ्या जावयाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बाळू गंगाधर तायडे (रा. भराडी, ता. सिल्लोड, ह.मु. वडगाव कोल्हाटी) हा पत्नी साधना तायडे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करीत होता. ४ जानेवारीला बाळूने साधनाशी वाद घालत तिला मारहाण केली. यामुळे साधनाने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पती बाळू तायडे याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. यानंतर साधना वडगावात आई-वडिलांच्या घरी निघून गेली होती. साधनाने आपल्याविरुद्ध तक्रार दिल्याचे कळताच दुसºया दिवशी बाळूने वडगावात जाऊन तक्रार का दिली, या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच बाळूने साधनाच्या पोटावर चाकूने वार केला. मदतीसाठी आलेल्या साधनाची बहीण शुभांगी व आई कमलबाई यांच्यावरही वार करून तो पसार झाला. यात गंभीर जखमी झालेल्या साधनाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. कमलबाई व शुभांगी यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी फरार झालेल्या बाळू तायडे याला रविवारी सायंकाळी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Chakahala on mother-in-law and mother-in-law with wife