नगराध्यक्ष पदासाठी परळीमध्ये चुरस
By Admin | Updated: July 19, 2014 00:41 IST2014-07-18T23:42:34+5:302014-07-19T00:41:01+5:30
परळी : नगराध्यक्षपदासाठी भाजपा उमेदवार कुसुम साठे यांनी भरलेला अर्ज शुक्रवारी मागे घेतला़ यानंतर आता नगराध्यक्षपदासाठी भाजपचा फुटीर गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामध्ये चुरस निर्माण झाली आहे़

नगराध्यक्ष पदासाठी परळीमध्ये चुरस
परळी : नगराध्यक्षपदासाठी भाजपा उमेदवार कुसुम साठे यांनी भरलेला अर्ज शुक्रवारी मागे घेतला़ यानंतर आता नगराध्यक्षपदासाठी भाजपचा फुटीर गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामध्ये चुरस निर्माण झाली आहे़
नगराध्यक्ष पदासाठी कुसुम चाटे यांच्यासह बाजीराव धर्माधिकारी व काँग्रेसचे प्रा़ विजय मुंडे यांनी अर्ज भरलेला आहे़ अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी शनिवारी दुपारी १२़३० वाजता पीठासीन अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी सविता चौधर यांच्या उपस्थितीत नगर परिषद सभागृहात बैठक बोलावण्यात आलेली आहे़
असे असले तरी आता अध्यक्ष कोण होईल याची चुरस निर्माण झाली आहे़ अडीच वर्षापूर्वी काँग्रेसने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला होता़ त्या पाठिंब्याच्या बळावर दीपक देशमुख हे अध्यक्षपदी निवडून आले़ यावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसचे उमेदवार प्रा़ विजय मुंडे यांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा़ टी़ पी़ मुंडे यांनी व्यक्त केली आहे़
दरम्यान, या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ पालिकेवर भाजपचा उमेदवार निवडला जाईल यासाठी फुटीर नगरसेवकांना भाजपने आवाहन केले होते मात्र फुटीर नगरसेवकांनी आपला मनसुबा कायम ठेवल्याने भाजप उमेदवाराला माघार घ्यावी लागल्याचे भाजप कार्यकर्ता नीळकंठ चाटे यांनी सांगितले़ (वार्ताहर)