वरातीत नाचण्यावरून महिलेस मारहाण करीत काढली छेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 21:27 IST2019-01-17T21:27:02+5:302019-01-17T21:27:21+5:30

लग्नाच्या वराती नाचू देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आठ ते दहा जणांनी लाठ्या,काठ्याने मारहाण करून महिलेची छेड काढली.

 Chad has been assaulted by women in dancing | वरातीत नाचण्यावरून महिलेस मारहाण करीत काढली छेड

वरातीत नाचण्यावरून महिलेस मारहाण करीत काढली छेड

औरंगाबाद : लग्नाच्या वराती नाचू देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आठ ते दहा जणांनी लाठ्या,काठ्याने मारहाण करून महिलेची छेड काढली. ही घटना १६ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास हर्सूल येथे घडली. याप्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.


शेख जुनेद, शेख अरबाज शेख रियाज, शेख आवजे शेख युनूस, शेख रियाज शेख गयाज(रा. यासीननगर), शेख फैजान आणि अन्य आठ ते दहा अनोळखींचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे.


तक्रारदार यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त १६ जानेवारी रोजी रात्री हर्सूल परिसरात स्वागतसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त काढलेल्या वरातीत आरोपी नाचण्यासाठी आले. त्यावेळी तक्रारदार महिलेने त्यांना नाचण्यास मनाई केल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यांनी महिलेसह त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केली. यावेळी आरोपींनी शामियानाची तोडफोड करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

Web Title:  Chad has been assaulted by women in dancing