शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तावाढीसाठी सीईओंचा पुढाकार

By admin | Updated: November 24, 2014 12:40 IST

जिल्ह्यात शौचालय बांधकामाच्या माध्यमातून भारत स्वच्छता अभियानाला गती देणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी शिक्षण विभागातील 'स्वच्छता मोहीम'ही तितक्याच वेगाने राबविली आहे.

 नांदेड : जिल्ह्यात शौचालय बांधकामाच्या माध्यमातून भारत स्वच्छता अभियानाला गती देणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी शिक्षण विभागातील 'स्वच्छता मोहीम'ही तितक्याच वेगाने राबविली आहे. शौचालय बांधकाम, पाणीटंचाई, अपूर्ण कामे आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तालुकास्तरावर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईला प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अंतर्गत वादातून कामे खोळंबली आहेत. पाणीपुरवठय़ासह अन्य विभागांचे कामेही अर्धवटच राहिले आहेत. याबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेवून काळे यांनी तालुकास्तरावर आढावा बैठक बोलावली आहे. बैठकीत उपरोक्त विषयांसह शैक्षणिक गुणवत्ता वाढीवरही चर्चा केली जात आहे. जिल्हा परिषद अधिकार्‍यांना शाळा भेटी देवून तेथील भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांची प्रगती याबाबत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. या उपक्रमास १९ नोव्हेंबर रोजी किनवटपासून प्रारंभ झाला आहे. येथे किनवट, माहूर, हिमायतनगर आणि हदगाव तालुक्याची संयुक्त आढावा बैठक झाली. तर ३ डिसेंबर रोजी भोकरमध्ये भोकर, मुदखेड आणि अर्धापूर या तालुक्यांची संयुक्त बैठक होणार आहे. १७ डिसेंबरला कंधार पंचायत समितीत कंधार, लोहा व मुखेड आणि २0 डिसेंबर रोजी देगलूर पंचायत समितीमध्ये नायगाव, उमरी, धर्माबाद, देगलूर, बिलोली तालुक्याची बैठक होणार आहे. या बैठकीस जिल्हा परिषदेचे सर्व तालुकास्तरीय अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत./(प्रतिनिधी)