केंद्रेकरांनी केली कानउघाडणी

By Admin | Updated: May 24, 2014 02:09 IST2014-05-24T01:52:03+5:302014-05-24T02:09:51+5:30

वाळूज महानगर : वाळूज सिडको महानगर १, २ व ३ च्या विकासासंदर्भात सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी आज सिडको महानगरातील शेतकर्‍यांची मते जाणून घेतली.

The central leaders said the homily | केंद्रेकरांनी केली कानउघाडणी

केंद्रेकरांनी केली कानउघाडणी

वाळूज महानगर : वाळूज सिडको महानगर १, २ व ३ च्या विकासासंदर्भात सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी आज सिडको महानगरातील शेतकर्‍यांची मते जाणून घेतली. याशिवाय भूखंडधारकांची गाºहाणी ऐकून घेत तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. वाळूज सिडको महानगर १, २ व ३ चा विकास करण्यासंदर्भात या भागातील शेतकर्‍यांची काय भूमिका आहे. यासाठी सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील कें द्रेकर यांनी शेतकर्‍यांसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत काही शेतकर्‍यांनी २५-७५ च्या जुन्या मॉडेलप्रमाणे महानगराच्या विकासासाठी जमीन देण्याची तयारी दर्शविली, तर काहींनी जमिनी देण्यास नकार देत अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी केंदे्रकर यांनी शेतकरी जोपर्यंत स्वत: राजी होत नाही. त्यांच्या शंकांचे पूर्ण निरसन होत नाही. तोपर्यंत सिडको प्रशासन शेतकर्‍यांच्या जमिनी घेणार नाही. असे स्पष्ट केले. अनेक शेतकर्‍यांना रेडिरेकनरचे दर माहीत व्हावे, तसेच विविध नियमांची माहिती व्हावी, अशी मागणी केली. सिडकोच्या विकासासंदर्भात प्रशासन प्रत्येक शेतकर्‍याला मराठीतील माहिती पुस्तिका देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीला अधीक्षक अभियंता राजेंद्रसिंह सिसोदिया, सोमीनाथ उईके, प्रणिता तायडे, एस.एस.पोळ, राजेंद्र शहापूरकर यांच्यासह शेतकर्‍यांची उपस्थिती होती. उद्यानाच्या विकासालाही लवकरच सुरुवात करण्यात येईल. एसटीपी प्लॅन्टचे काम झाल्यानंतर ड्रेनेजचे काम करण्यात येणार असल्याचे सांगून स्ट्रीट लाईट व अंतर्गत लाईट, पाणी गळतीची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या. यावेळी नारायण हातोळे, पंजाबराव देशमुख, विष्णू जाधव, राकेश सक्सेना, सतीश उदावंत, दत्तात्रय निसळ, उत्तम ठोकळ, यशवंत चौधरी, दशरथ हाजारी, उत्तम चव्हाण, प्रदीप हांडे, बाळासाहेब जाधव, ललित पहाडिया, अरुणा साठे, बयोबाई जावळे, इंदूबाई मोरे, सुनीता गोपाळ, लता लोखंडे, अरुणा चंदालिया, किसन खराटे, रवींद्र चेके, बाळासाहेब कदम, ताराचंद गायवत, सुधाकर वाघमारे, अशोक जाधव यांच्यासह आदी नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान, सुनील केंद्रेकर यांच्यासमोर सिडको महानगर १,२ व ३ भागातील नागरिकांनी तक्रारींचा पाऊसच पाडला. निश्चित आणि सुरळीत पाणीपुरवठा करावा, अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करून त्यावर गतिरोधक बसविण्यात यावे, ड्रेनेजलाईनची व्यवस्था करावी, रस्त्यावरील व अंतर्गत भागातील लाईट सुरू करावी, उद्यानाची दुरवस्था दूर करावी, करण्यात न येणारी फवारणी वेळच्या वेळी करावी. आदी मागण्या केल्या. यावर केंद्रेकर यांनी पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल व एमआयडीसीशी चर्चा करून वेळही निश्चित केली जाईल, असे आश्वासन दिले. नागरिकांनी वीज, पाणी याविषयीच्या तक्रारींबाबत अधिकारी कसे दुर्लक्ष करतात हे केंद्रेकरांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी अधिकार्‍यांनी दिलेली उडवा उडवीची उत्तरे ऐकून केंद्रेकर यांनी अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली व कामात कामचुकारपणा करणार्‍या अधिकार्‍यांची यापुढे काही खैर नाही. असा दमही भरला.

Web Title: The central leaders said the homily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.