शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ५० हजारासाठी सिद्धार्थ उद्यानातील तिसरा डोळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:20 IST

महापौर नंदकुमार घोडेले यांच्या आढाव्यात ही माहिती समोर आली. 

ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षितता वाऱ्यावर नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष

औरंगाबाद : देशभरात सध्या सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य दिले जात असताना महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. देखभाल-दुरुस्तीसाठी केवळ ५० हजारांचा खर्च आहे; परंतु त्यास मंजुरी मिळत नसल्याने ‘सीसीटीव्ही’ची दुरुस्ती होत नाही.

सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हे नेहमीच पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मनपाने उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचा आढावा घेतला. त्यावेळी ही माहिती समोर आली. 

उद्यानातील सीसीटीव्ही सुरू आहेत का, अशी विचारणा महापौरांनी अधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, समोरच्या भागातील तेवढे सुरू आहेत. मात्र, आतील सीसीटीव्ही बंद आहेत. दुरुस्तीसाठी ४९ हजार रुपयांची संचिका तयार करून ती प्रशासनाकडे सादर केली; परंतु त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही, असेही पाटील यांनी सांगितले. 

सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती ऐकून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. देशभराबरोबर शहरातही अलर्ट आहे. कडेकोट सुरक्षेवर भर दिला जात असताना मनपा प्रशासन सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.

३.५० कोटींचे उत्पन्नमनपाला सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातून वर्षाकाठी ३.५० कोटींचे उत्पन्न मिळते. त्यातुलनेत प्राणिसंग्रहालयातील कामांवर केवळ २० लाखांचा खर्च झाल्याची माहिती महापौरांच्या बैठकीत समोर आली, तरीही निधीसाठी प्रशासनाकडे हात पसरविण्याची वेळ येत आहे. त्यामुळे एप्रिलपासून उद्यानाचे स्वतंत्र खाते उघडण्याची सूचना महापौरांनी केली. 

टॅग्स :cctvसीसीटीव्हीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका