सीसीटीव्हीमुळे लागला चोरट्यांचा सुगावा
By Admin | Updated: September 14, 2014 23:57 IST2014-09-14T23:54:42+5:302014-09-14T23:57:21+5:30
जालना : शहरातील पारसी गल्ली भागात चोरट्यांनी १२ सप्टेंबरच्या रात्री अजित कोठारी यांच्या दुकानात चोरी केली.

सीसीटीव्हीमुळे लागला चोरट्यांचा सुगावा
जालना : शहरातील पारसी गल्ली भागात चोरट्यांनी १२ सप्टेंबरच्या रात्री अजित कोठारी यांच्या दुकानात चोरी केली. या चोरीची संपूर्ण घटना सी.सी.टी.व्ही. कॅमेरात चित्रिकरण झाली. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोठारी यांचे महावीर स्वीट मार्ट व मोबाईल शॉपी आहे. याठिकाणी चोरट्यांनी ३ हजार ९५० रूपयांच्या रोकडसह १० हजार ९५० चोरी करण्यात आली, अशी माहिती जमादार सुभाष बारोटे यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास जमादार विठ्ठल मेकले करीत आहेत.
आरोपींनी चोरी करतांना तोंडाला कापड गुंडाळले होते. मात्र त्यांच्यावरील टीशर्टवर छापलेल्या चित्रामुळे विशेष कृती दलाच्या पथकाने दोघा चोरट्यांचा माग काढला. यातील आरोपी तेजासिंग नरसिंग बावरी याला पकडण्यात यश आले. त्याच्या ताब्यातून १ हजार २९६ रूपये जप्त करण्यात आले. त्याचा दुसरा साथीदार विक्रमसिंग धनुरासिंग टाक हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. पथकात सहायक निरीक्षक विनोद इज्जपवार, विनायक कोकणे, विनोद गडदे, मारूती शिवरकर, सुनील म्हस्के, फुलचंद हजारे, कृष्णा देठे, चालक नजीर पटेल आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)