कत्तलीसाठी आणलेली जनावरे पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:04 IST2021-07-18T04:04:07+5:302021-07-18T04:04:07+5:30
औरंगाबाद : बकरी ईदच्या निमित्ताने शहरात लावलेल्या नाकाबंदीत सिल्लेखाना येथे अवैधपणे आणण्यात येत असलेल्या ११ जनावरांचा टेम्पो क्रांती चौक ...

कत्तलीसाठी आणलेली जनावरे पकडली
औरंगाबाद : बकरी ईदच्या निमित्ताने शहरात लावलेल्या नाकाबंदीत सिल्लेखाना येथे अवैधपणे आणण्यात येत असलेल्या ११ जनावरांचा टेम्पो क्रांती चौक पोलिसांनी शनिवारी सकाळी ९ वाजता विभागीय ग्रंथालयासमोर पकडला.
क्रांती चौक पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खबऱ्यामार्फत कार्तिकी चौकाकडून सिल्लेखाना चौकाकडे एका वाहनातून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यानुसार, पोलिसांच्या पथकाला सावरकर चौकात एक टेम्पो (क्रमांक एम.एच. १७, टी.८२०१) येत असल्याचे दिसून आले. त्यास पोलिसांच्या पथकाने थांबवले असता, टेम्पो चालकाने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांच्या पथकाने टेम्पोचा पाठलाग करून, वाहन शासकीय ग्रंथालयासमोर थांबविले. यात असलेला एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. चालकाला पकडण्यात आले. सदरील टेम्पोची तपासणी केली असता, त्यात अवैधपणे ११ जनावरे कोंबल्याचे दिसून आले. पथकाचे प्रमुख एपीआय सूर्यतळ यांनी सदरील टेम्पोचा पंचासमक्ष पंचनामा करून वाहन, ११ जनावरांसह एकूण ४ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पकडलेला चालक फैसल खान पि. फेरोज खान (२९, रा.इंदिरानगर, न्यू बायजीपुरा) यास विचारले असते, त्याने सदरील जनावरे मुजाहेद खान नासेर खान (रा.सिल्लेखाना) याची असल्याचे सांगितले. यावरून दोघांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरील पकडलेली जनावरे बेगमपुरा भागातील गुरू गणेश गोशाळा येथे संगोपणाकरिता ताब्यात देण्यात आली आहे. ही कारवाई एपीआय राहुल सूर्यतळ, पोलीस नाईक वानखेडे, गायकवाड, पुरी, खोगरे यांच्या पथकाने केली.