आडूळजवळ कार पेटली; ५ जण बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:06 IST2018-04-16T01:06:15+5:302018-04-16T01:06:29+5:30

नांदेड जिल्ह्यातील कंधारहून औरंगाबादकडे येणारी कार रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आडूळजवळ अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील पाच जण कारमधून बाहेर पडल्याने बालंबाल बचावले.

 A car exploded near the scalp; 5 people escaped from Balangal | आडूळजवळ कार पेटली; ५ जण बालंबाल बचावले

आडूळजवळ कार पेटली; ५ जण बालंबाल बचावले

आडूळ : नांदेड जिल्ह्यातील कंधारहून औरंगाबादकडे येणारी कार रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आडूळजवळ अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील पाच जण कारमधून बाहेर पडल्याने बालंबाल बचावले.
औरंगाबाद शहरातील म्हाडा कॉलनीतील कारचे मालक हाफीज सद्दाम जहीर शेख, चालक सलमान जहीर शेख, गंगाधर माणिकराव मोंडाळे, त्यांची पत्नी संध्या, भक्ती व स्नेहल मोंडाळे या दोन मुली असे पाच जण या कारमध्ये होते. कारने पेट घेतल्याचे कारण कळू शकले नाही. आडूळजवळ कार पेटल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी थांबविली आणि सर्व जण फटाफट बाहेर पडले. त्यांच्या डोळ्यादेखत कार जळत होती. त्यांनी रस्त्यावर उभे राहून हे दृश्य पाहिले. यानंतर त्यांनी दुसरी कार मागवून औरंगाबाद गाठले. घटनेची माहिती मिळताच पाचोडचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार पेटल्यावर आग विझविण्यासाठी यंत्रणा व मनुष्यबळ नसल्याने संपूर्ण कार भस्मसात झाली. महामार्गावर कार पेटल्याचे पाहून अनेक वाहनांनी जागीच थांबणे पसंत केले. पुढील तपास पाचोड पोलीस करीत आहेत.

Web Title:  A car exploded near the scalp; 5 people escaped from Balangal