उमेदवारांना द्यावा लागेल दिवसाआड हिशेब
By Admin | Updated: September 16, 2014 01:36 IST2014-09-16T01:15:48+5:302014-09-16T01:36:21+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सुरू केले आहे.

उमेदवारांना द्यावा लागेल दिवसाआड हिशेब
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सुरू केले आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये प्लार्इंग स्क्वॉड तसेच निवडणुकीत होणाऱ्या खर्चावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र खर्च पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणे प्लार्इंग स्क्वॉड, व्हिडिओ पथक, सांख्यिकी, उमेदवारांचा जमाखर्च पाहणाऱ्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरातील शासकीय कार्यालये, बीएसएनएल, जीटीएल, तसेच अन्य कार्यालयांच्या मालमत्तेवरील उमेदवार, तसेच पक्षांच्या जाहिराती काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या वतीने प्रचारासाठी पोस्टर तसेच हँडबिल छापण्यात येतात. यासंबंधी मुद्रक, प्रकाशकाचे नाव, किती प्रती छापायच्या आहेत याची संख्या तसेच एक नमुना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी सांगितले.
शहरातील तीन मतदारसंघांची कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय शासकीय कला महाविद्यालय, किलेअर्क येथे राहणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात आहेत. सहायक अधिकारी म्हणून अभय म्हस्के व सुमन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
४पश्चिम मतदारसंघाचे कार्यालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राहणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी रीता मेत्रेवार राहणार आहेत. तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे कार्यालय शासकीय तंत्रनिकेतन येथे तयार करण्यात येणार आहे.
या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती कारले आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय राऊत व संगीता चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
४ प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये अर्ज स्वीकृती, छाननी होणार असून, येथेच स्ट्राँगरूम राहणार आहे. तसेच त्या- त्या कार्यालयामध्ये मतमोजणीची प्रक्रियाही राबविण्यात येणार आहे.