शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

विमान रद्द; प्रवासी संतप्त

By admin | Updated: December 17, 2014 00:39 IST

औरंगाबाद : बहुतांश प्रवासी ४ वाजता विमानतळावर पोहोचले; पण तिथे गेल्यावर दिल्लीचे विमान रद्द झाल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर प्रवाशांचा राग अनावर झाला.

औरंगाबाद : बहुतांश प्रवासी ४ वाजता विमानतळावर पोहोचले; पण तिथे गेल्यावर दिल्लीचे विमान रद्द झाल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर प्रवाशांचा राग अनावर झाला. त्यामुळे विमान कंपनीचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये वादावादी सुरू झाली. याचवेळी एक कर्मचारी प्रवाशांशी उद्धट बोलला. यामुळे सर्व प्रवासी संतापले. संभ्रमाची स्थिती सायंकाळचे ५.३० वाजेचे विमान रद्द झाले याची तोंडी माहिती मिळत होती. मात्र, कंपनीने कोणताच मेसेज पाठविला नाही. कर्मचारीसुद्धा कोणतीही ठोस माहिती प्रवाशांना देत नव्हते. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या विमानाने पाठविणार का, तिकिटाची पूर्ण रक्कम परत देणार का किंवा आणखी कोणती व्यवस्था करणार, असे अनेक प्रश्न प्रवासी विचारत होते; पण कर्मचाऱ्यांकडे कोणतेच उत्तर नव्हते. दोन महिन्यांपूर्वी केली बुकिंग दिल्लीचा रहिवासी युवराज नरुला याने सांगितले की, स्पाईस जेटने एक ते दोन महिन्यांपूर्वी विशेष योजना जाहीर केली. त्याअंतर्गत मी औरंगाबादचे येण्या-जाण्याचे तिकीट काढले होते. औरंगाबादमधील पर्यटनस्थळे पाहून व शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेऊन मी आज दुपारच्या विमानाने दिल्लीला जाणार होतो. मात्र, अचानक विमान रद्द झाल्याने मी उद्या आॅफिसला वेळेवर पोहोचू शकणार नाही. विजयकुमार बन्सल म्हणाले की, जालना येथे लग्नासाठी आलो होतो. दीड महिन्यापूर्वी तिकीट बुक केले होते. आज विमानतळावर येईपर्यंत आम्हाला विमान रद्द झाल्याचे कंपनीने कळविले नव्हते. कर्मचारीही उद्धटासारखे बोलत आहेत. जळगावचे मनोज पाटील म्हणाले की, बुधवारी दिल्ली येथे बिझनेस मीटिंग आहे. त्यासाठी आज मला तेथे पोहोचणे आवश्यक होते. आता ३५ हजार रुपये खर्च करून दुसऱ्या विमानाने जाण्याशिवाय पर्याय नाही. विमान कंपन्यांनी प्रवाशांचा छळ मांडला असल्याचा आरोप त्यांनी केला. हिरेश गुप्ता या विद्यार्थ्याला शिमला येथे बुधवारी सरकारच्या वतीने स्कॉलरशिप प्राईज मिळणार होते. मात्र, त्याला वेळेवर पोहोचता येणार नसल्याने त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. एका प्रवाशाचे दिल्लीहून मध्यरात्री ३ वाजता न्यूर्याकचे विमान होते. त्याला न्यूयार्कचे तिकीट रद्द करावे लागले.