किरायेदार म्हणून आले ; घरमालक समजू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:00+5:302021-07-07T04:06:00+5:30

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : शहरात स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी बहुतांश लोकांनी कॉम्प्लेक्स व बिल्डिंग तसेच घरे भाड्याने दिली आहेत. अनेकदा ...

Came as a tenant; The landlord began to understand | किरायेदार म्हणून आले ; घरमालक समजू लागले

किरायेदार म्हणून आले ; घरमालक समजू लागले

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : शहरात स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी बहुतांश लोकांनी कॉम्प्लेक्स व बिल्डिंग तसेच घरे भाड्याने दिली आहेत. अनेकदा उपद्रवी भाडेकरू किरायदार म्हणून आले आणि स्वतःला घर मालक समजू लागल्यामुळे भांडणाचे प्रकार वाढले आहेत. काही केसेस मात्र कोर्टापर्यंत सुरू आहेत.

मालकाकरवी घरातील सामान बाहेर फेकण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. करारनामा असलेल्या लोकांनाही या उपद्रवाला सामोरे जावे लागते. चार भिंतींच्या आतील आपले भांडण पोलीस स्टेशन आणि कोर्टातदेखील जात असल्यामुळे घरमालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

घर भाड्याने देताना समोरच्या व्यक्तीचे आधार कार्ड, त्याच्याकडे असलेल्या वोटर आयडी या घरमालकांनी सोबत घेतलेल्या पाहिजे. परिसरात प्रतिष्ठित माणसाने कोणाला ओळखतो, याचीसुद्धा खात्री करून घ्यावी. अचानक उद्भवलेल्या प्रसंगाला सामोरे जाताना समोरच्या व्यक्तीला अद्दल घडविणे सोपे जाते. शकतो हा प्रकार गुंठेवारी एरियामध्ये मोठ्या प्रमाणात घडलेला आहे.

अनेकदा भाडेकरू हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या सांगण्यावरून करतो आणि घर मालकाला मनस्तापातून कमी-अधिक भावात ती मालमत्ता विक्री काढावी लागते, तेव्हा त्यातून त्याची सुटका होते. त्या मालमत्तेवर असलेला डोळा समोरचा व्यक्ती साध्य करतो.

घर भाड्याने देताना ही काळजी..

-भाडे करारनामा करून घ्यावा त्यात सर्व गोष्टी नमूद कराव्यात

-समोरच्या व्यक्तीच्या ओळखीचा फोटो आयडीदेखील आपल्याकडे असावा.

-ज्या परिसरामध्ये भाडेकरू राहायला आला, त्याने जुनं घर का सोडले, घरांतील तुटफुट दुरुस्ती, तसेच काही बदल नुकसान हे देखील स्पष्ट लिहावे.

अनेक प्रकरणे न्यायालयात...

१) घरातील पाणी बिल लाईट बिल यावरून घर मालक आणि किरायदार यांच्यात भांडणे होतात

२) भाडे वेळेवर न देणे, घर खाली न करणे, भाडे घेण्यासाठी आल्यावर घर मालकाला शिव्या देणे

३) लोकांच्या सांगण्यावरून घर मालकासोबत भांडणाचे प्रकार वाढले

४) एखादा भू माफिया जागा बळकावण्यासाठी किरायदारामध्ये भांडणे लावतो, पडद्याआड राहून साथ देतो.

५) अनेकदा ऐरणीवर आलेले भांडणं मध्यस्ताच्या प्रयत्नाने अर्थाअर्थी सोडविले जातात.

पोलीस प्रमुखाचा कोट.....

परिसरात अनेक ठिकाणी किरकोळ बाबीवरून भांडणे होतात. भांडणे टोकाला जातात. काही लोकांच्या सांगण्यावरून भाडेकरू आणि घरमालक यांच्यात संबंध बिघडण्याचे प्रकार होतात. समजूत घालून भांडणे सोडविली जातात, अन्यथा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करावी लागते.

-घनशाम सोनावणे, सहायक पोलीस निरीक्षक.

(८८८ डमी)

Web Title: Came as a tenant; The landlord began to understand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.