शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बसथांब्यांची दुरवस्था

By admin | Updated: September 20, 2014 00:27 IST

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील बसथांबे मोडकळीस आले असून, सभोवताली काटेरी झुडपे, गवत वाढल्याने बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे.

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील बसथांबे मोडकळीस आले असून, सभोवताली काटेरी झुडपे, गवत वाढल्याने बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसथांबे जनावरांचे कुरण बनले आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थी व नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातआहे. सिडको वाळूज महानगरातील बसथांबा मोडकळीस आला असून, विद्यार्थी व प्रवाशांना बसण्यासाठी जागाच नाही. बसथांब्याभोवती काटेरी झाडेझुडपे व गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गवत खाण्यासाठी मोकाट जनावरांचा येथे मुक्त संचार असतो.विद्यार्थी व प्रवाशांना रस्त्यावरच कधी भर उन्हात, तर कधी पावसात ताटकळत उभे राहावे लागत आहे. साप, घूस इ. सरपटणारे प्राणी याठिकाणी वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे येथे उभे राहणेही धोक्याचे ठरत आहे.शिवाय मोकाट जनावरे बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थिनी व महिलांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे त्यांना येथे उभे राहणेही अवघड झाले आहे. मोरे चौक व महाराणा प्रताप चौकातील बसथांब्याचे नुसते अवशेष शिल्लक आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना चौकातच वाहनांच्या गर्दीत बसची प्रतीक्षा करीत उभे राहावे लागत आहे. वाळूज महानगरातील विद्यार्थी व नागरिकांची शहरात सतत ये-जा सुरू असते. अनेक वेळा मागणी करून प्रशासन बसथांब्यांच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.संबंधित प्रशासनाने लवकर या बसथांब्याची दुरुस्ती करून बसण्याची व्यवस्था करावी व परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी त्रस्त विद्यार्थी व नागरिकांमधून केली जातआहे.