बस अपघातातून आगारप्रमुख बचावले
By Admin | Updated: December 9, 2015 23:56 IST2015-12-09T23:27:13+5:302015-12-09T23:56:19+5:30
बीड : येथील बसस्थानकातून भरधाव बाहेर जाणाऱ्या बसने बीड आगाराचे आगारप्रमुख ए.एस.भुसारी यांच्या दुचाकीला बुधवारी सकाळी धडक दिली. सुदैवाने भुसारी

बस अपघातातून आगारप्रमुख बचावले
बीड : येथील बसस्थानकातून भरधाव बाहेर जाणाऱ्या बसने बीड आगाराचे आगारप्रमुख ए.एस.भुसारी यांच्या दुचाकीला बुधवारी सकाळी धडक दिली. सुदैवाने भुसारी यांनी प्रसंगावधान राखत बाजुला धाव घेतली. यामुळे पुढील अनर्थ टळला.
बसने (एम.एच.४० वाय. ५७४७) आगारप्रमुख भुसारी यांच्या दुचाकीला धडक दिली. परंतु वेळीच नागरीकांनी आरडाओरडा केल्याने चालकाने बस जागेवर थांबवली आणि बसच्या पुढच्या (डावी बाजू) टायरखाली दुचाकीचे टायर आडकले. सुदैवाने यामध्ये आगारप्रमुख बालंबाल बचावले. परंतु असे प्रकार यापूर्वीही घडले असून याठिकाणी गेट बसवून वॉचमन नेमावा, बाहेर जाणाऱ्या बसगाड्यांची नोंद होणे आवश्यक आहे. मात्र, हाच हलगर्जीपणा बुधवारी खुद्द आगारप्रमुखांच्याच जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)