शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरवर बस धडकून ६ प्रवासी जखमी; तर अपघात पाहताना ४ कार एकमेकांवर आदळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:51 IST

हा अपघात पाहण्यास थांबल्याने चार कार एकमेकांवर आदळल्याने पुन्हा एक अपघात होऊन चारही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

- श्रीकांत पोफळेकरमाड:जालना महामार्गावर सटाणा पाटीवर उभ्या कंटेनरला बसने मागून धडक दिल्याची घटना आज सकाळी ७. ३० वाजता घडली. अपघातात बसमधील महिला वाहक आणि ६ प्रवासी जखमी आहेत. यातील एक प्रवासी बाजीगर अशोक गायकवाड (२५, रा. शहा नगर, छत्रपती संभाजीनगर) हा गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, हा अपघात पाहण्यास थांबल्याने चार कार एकमेकांवर आदळल्याने पुन्हा एक अपघात होऊन चारही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

आज पहाटे पासून अवकाळी पाऊस पडून सर्वत्र धुके पसरलेले असल्याने अंधुक प्रकाश होता. छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावर असलेल्या सटाणा पाटीवर जालन्याच्या दिशेला जाणाऱ्या बाजूने एक कंटेनर (MH20DE9783) उभा होता. या उभ्या कंटेनवर जालनाकडे जाणारी सिडको आगाराची बस (MH20BL3035) पाठीमागून धडकली. यावेळी बसमध्ये चालक गंगाधर उत्तम मोरे आणि १५ प्रवासी होते. महिला बस वाहकासह ६ प्रवासी जखमी झाले आहेत. धडक इतकी जोरदार होती की सटाणा गावापर्यंत या अपघाताचा आवाज पसरला. आवाज ऐकून सटाणा गावच्या तरुणांनी अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना बसमधून बाहेर काढून वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिकेत  रवाना केले. या अपघातात बसच्या समोरची डावी बाजू पूर्णपणे चकनाचूर झाली.

अपघातात जखमी:अशोक गायकवाड (वय २५), प्रिया अशोक गायकवाड ( वय ३५), जिजाबाई अशोक गायकवाड ( ५०) सर्व रा. शहा नगर, छत्रपती संभाजीनगर, हमीद अब्दुल चाऊस ( ३२), समीर हमीद चाऊस ( २०) दोघे रा. हर्सूल, छत्रपती संभाजीनगर, व महिला वाहक सोनाली बागडे (३५) असे ६ प्रवासी जखमी आहेत.

अपघात पाहताना ४ कार एकमेकांवर धडकल्यारस्त्यावरील कंटेनर-बसचा अपघात पाहण्यासाठी एका कारणे गती कमी केली. यामुळे पाठीमागून आलेल्या ४ कार देखील एकमेकांना धडकल्या. सुदैवाने यात कोणाला इजा झाली नाही. त्यानंतर दोन कार घटनास्थळावरून निघून गेल्या. तर दोन कार घटनास्थळी उभ्या होत्या.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरJalanaजालनाAccidentअपघात