शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

औरंगाबादजवळ बस आणि टेंपोचा भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 2:19 PM

फुलंब्रीकडे जाणारी बारामती - रावेर बस आणि औरंगाबादच्या दिशेने येणारा आयशर टेंपो यांच्यात दुपारी १.३० च्या दरम्यान भीषण अपघात झाला.

औरंगाबाद : फुलंब्रीकडे जाणारी बारामती - रावेर बस आणि औरंगाबादच्या दिशेने येणारा आयशर टेंपो यांच्यात दुपारी १.३० च्या दरम्यान भीषण अपघात झाला. यात जवळपास २५ प्रवासी जखमी असून ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

औरंगाबाद बसस्थानकावरून  बारामती ते रावेर ही बस ( एमएच २० -बीएल ३१०० ) दुपारी एक वाजता जळगाव कडे जाण्यास निघाली. बसने हर्सूलच्या पुढील सावंगी टोलनाका ओलांडल्यानंतर काही अंतर पार करताच समोरून येणाऱ्या टेंपो ( एमएच १८ -एए ५४५४ ) सोबत जोराची टक्कर झाली. दोन्ही वाहने वेगात असल्याने टेंपोच्या धडकेने बसची उजवी बाजू अक्षरशः कापली गेली. याबाजूने बसलेले सर्वच प्रवासी  गंभीर जखमी झाले. तर डाव्याबाजूने बसलेली प्रवास्यांना मुकामार लागला. यात २५ प्रवासी जखमी असून यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना खाजगी रुग्णवाहिकेद्वारे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

जोरदार आवाजाने सारेच घाबरले दोन्ही वाहने वेगात पुढे जात असल्याने त्यांची समोरासमोर धडक होताच मोठा आवाज झाला. यामुळे बसमधील सर्व प्रवासी प्रचंड घाबरून गेले. बाहेर कसे पडायचे या विंवचनेत काही जण ओरडत होती तर लहान मुलांना रडू कोसळले. त्यांना मदतीसाठी आलेल्या लोकांनी बाहेर काढत धीर दिला. 

 

लोक वेळीच मदतीला धावले अपघात होताच आजूबाजूचे लोकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. दोन्ही गाड्यांच्या केबिन पूर्णतः चिरल्या गेल्या होत्या. यामुळे दोन्ही चालक त्यात अडकून पडली होती. लोकांनी केबिन तोडून त्यांना ओढून बाहेर काढले. 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादhersulहर्सूल