दिवसाढवळ्या जिंतुरात घरफोडी
By Admin | Updated: August 17, 2014 00:14 IST2014-08-17T00:14:30+5:302014-08-17T00:14:30+5:30
जिंतूर : शहरातील मुख्य चौकात दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह तीन लाखांचा ऐवज लंपास केला़

दिवसाढवळ्या जिंतुरात घरफोडी
जिंतूर : शहरातील मुख्य चौकात दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह तीन लाखांचा ऐवज लंपास केला़ यासंदर्भात जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
प्रतिष्ठित व्यापारी वसंत राघोबा कोकडवार यांचे घर मुख्य रस्त्यालगत कोमटी गल्ली भागात आहे़ कोकडवार हे आपल्या नातेवाईकांकडे बाहेरगावी गेले होते़ त्यांचा मुलगा कृष्णा व त्याचा मित्र दोघे सकाळी घराचे दार बंद करून दुकान उघडण्यासाठी घराबाहेर पडले़ १५ आॅगस्टच्या सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ घरातील दोन पत्राच्या पेटीमध्ये ठेवलेले ९ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के व रोख ११ हजार रुपये चोरट्यांनी पळविले़ या संदर्भातील फिर्याद जिंतूर पोलिसांत दिल्यानंतर श्वानपथकास पाचारण करण्यात आले़ श्वानपथकाने चौक बाजारापर्यंत माग काढला़ परंतु, तेथून चोरटे वाहनाद्वारे फरार झाल्याचे दिसते़ दरम्यान, शहर व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे़ (वार्ताहर)