शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्याच डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचे ओझे

By admin | Updated: July 3, 2014 00:24 IST

हिंगोली : कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी सांभाळताना थकून जाणाऱ्या आईच्या डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचेही ओझे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

हिंगोली : कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी सांभाळताना थकून जाणाऱ्या आईच्या डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचेही ओझे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांच्या अभ्यासाकडे वडिलांकडून जास्त लक्ष दिले जात नसल्याचेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे. पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करणाऱ्या महिलांच मुलांच्या अभ्यासाची जास्त जबाबदारी पेलत असल्याचे यातून स्पष्ट होते.सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना मुलांसाठी वेळ देणे कठीण झाले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलांबरोबर त्यांच्या पालकांचीही कसरत होत आहे, असे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले. घरात वडिलांना पूर्ण वेळ देता येत नसल्यामुळे आपल्या पाल्याची जबाबदारी नकळत आईवर येऊन पडते. मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. त्यामुळे शाळेतील शिक्षणाव्यतिरिक्त खासगी शिकवणीही लावली जाते. तसेच अनेक आई-वडील मुलांचा घरीही अभ्यास घेतात. मात्र, पालक म्हणून ही दोघांचीही समान जबाबदारी असताना मुलांच्या संगोपनाबरोबरच त्यांच्या शिक्षणाकडेही आईलाच लक्ष द्यावे लागते. त्यांचा गृहपाठ करून घेणे, त्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी ती प्रयत्न करीत असते. परंतु, काही वेळा बदलत्या अभ्यासक्रमामुळे मुलांच्या अभ्यासातील अडचणी सोडवणे पालकांना कठीण जाते. त्यामुळे पालक खासगी शिकवण्या लावण्याला प्राधान्य देतात. सर्वेक्षणामध्ये तब्बल ४३ टक्के मुलांच्या बाबतीत असे आढळून आले, की मुलांचे आई-वडील नोकरी करतात. तर, ४३ टक्के मुलांचा अभ्यासही आईला घ्यावा लागतो. मुलांचा अभ्यास घेण्यात केवळ १३ टक्के वडील सक्रिय असल्याचे समोर आले आहे. दोघेही मिळून अभ्यास घेणाऱ्या पालकांची टक्केवारी ३७ टक्के आहे. सर्वेक्षणामध्ये सुमारे ७ मुलांचा अभ्यास घरी कोणीही घेत नसल्याचेही दिसून आले. या मुलांना शाळा आणि खासगी शिकवणीमध्ये घेतल्या जाणाऱ्या अभ्यासावरच अवलंबून रहावे लागते.(प्रतिनिधी)अभ्यासातच गुरफटताहेत मुलेशाळेबरोबरच आता मुलांना शिकवणीसाठीही वेळ द्यावा लागतो. म्हणून त्यांचे दैनंदिन जीवन व्यस्त झाले आहे. शाळेमध्ये मुले साधारणत: पाच ते सहा तास असतात. घरात पाल्याचा अभ्यास घेण्यात आईचाच जास्त पुढाकार असल्याचे सर्व्हेक्षणात दिसून आले. आई व वडील दोघेही अभ्यास घेण्याचे प्रमाण ३० टक्के असल्याचेही दिसून आले.खासगी शिकवण्या या एका तासापासून अडीच तासांपर्यंत घेतल्या जातात. सर्वेक्षणानुसार ६० टक्के पालकांनी आपल्या मुलांसाठी दोन ते अडीच तास वेळ असलेली शिकवणी निवडली आहे. त्यामुळे अभ्यासात मुले पूर्णपणे गुरफटून गेली आहेत की काय? असा प्रश्न पडतो.