छावणीतील बंगला न. ९ देतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 11:53 AM2022-04-14T11:53:35+5:302022-04-14T11:58:03+5:30

Dr. Babasaheb Ambedkar: सन १९४५ ते १९५६ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा-जेव्हा औरंगाबादला येत असत त्यावेळी त्यांचे वास्तव्य बंगला नंबर ९ मध्ये असायचे.

Bungalow no. 9 in the containment giving light to the memories of Dr. Babasaheb Ambedkar! | छावणीतील बंगला न. ९ देतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा!

छावणीतील बंगला न. ९ देतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा!

googlenewsNext

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या औरंगाबादेत ज्ञानज्योत तेवत ठेवणाऱ्या निरंतर आठवणी आजही भीमसैनिकांसाठी तेजोमय असून, छावणीचा ९ नंबरचा बंगला आजही आठवणीला उजाळा देत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी.

सन १९४५ ते १९५६ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा-जेव्हा औरंगाबादला येत असत त्यावेळी त्यांचे वास्तव्य बंगला नंबर ९ मध्ये असायचे. बंगला नं. ७ व ८ मध्ये पी.ई.एस. एज्युकेशनची स्थापना झाल्यानंतर याच बंगल्यात कॉलेज सुरुवात करण्यात आले होते, त्या वेळेस मिलिंद कॉलेजचे बांधकाम चालू होते.

- याच बंगला नंबर ९ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल डॉ. बाबासाहेब यांना भेटण्याकरिता आले होते. (मराठवाडा मुक्ती संग्रामसंदर्भात )
- याच बंगल्यात बाबूलाल गारोल हे बाबासाहेबांचे केस कापण्याकरिता येत असत ( छावणी वाॅर्ड क्र. १ माजी नगरसेवक संजय गारोल यांचे वडील)
- छावणीतील वाॅर्ड क्र.६ मधील दंडू किशन कांबळे यांच्या घरी साहेबांचे छोटे कार्यालय होते.
- शिवराम जाधव हे छावणीचे रहिवासी. त्यांनी शेवटपर्यंत बाबासाहेबांची सेवा केली. बाबासाहेबांनी स्वतः नियुक्त केलेले मिलिंद कॉलेजचे पहिले शिपाई शिवराम जाधव.
- याच परिसरातील कौशल्याबाई गोरे या बाबासाहेबांच्या स्वयंपाक करायच्या.
- माजी महापौर अशोक सायन्ना यादव यांचे वडील व बाबासाहेबांची चांगली ओळख. साहेबांचे त्यांच्या घरी येणे-जाणे असायचे.
- माजी नगरसेवक भावश्या पैलवान हे मिलिंद कॉलेजचे बांधकाम चालू असताना साहेबांकडे काम मागण्यास गेले असता साहेबांनी त्यांची शरीरयष्टी पाहून विटा वर पोहोचविण्याचे काम दिले होते.
- छावणी परिसरातील बहुतेक घराघरांत साहेबांचा संर्पक होता.
- छावणी परिसरातील अनेक महिलांना मुलांच्या हॉस्टेलमध्ये स्वयंपाक करण्याचे काम दिले होते.
- बंगला नंबर ९ मध्ये सायंकाळी साहेब त्यांच्या सहकाऱ्यांची बैठक घेऊन मिलिंद कॉलेजच्या बांधकामाबाबत व इतर शैक्षणिक विषयावर चर्चा करायचे.
- त्या काळात मुलांना शिकवण्यासाठी पाठवा हे आवर्जून लोकांना सांगत.
- गड्डी गुडम वाॅर्ड क्र. ६ छावणी येथे सार्वजनिक ठिकाणी सामाजिक मंदिर (बौद्ध विहार) चालू करा, असे सुचविले होते.
- ९ नंबर बंगल्यात जवळपास २० कुटुंब वास्तव्यास आहेत. कैन्हयालाल दरक यांचा हा बंगला असल्याचे समजते.

Web Title: Bungalow no. 9 in the containment giving light to the memories of Dr. Babasaheb Ambedkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.