दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:10 IST2021-01-08T04:10:56+5:302021-01-08T04:10:56+5:30
संजय लक्ष्मण देहाडे (वय ३०, रा. मिसारवाडी) असे मृताचे नाव आहे. बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, कोहिनूर कॉलनीतील रहिवासी ...

दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू
संजय लक्ष्मण देहाडे (वय ३०, रा. मिसारवाडी) असे मृताचे नाव आहे. बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, कोहिनूर कॉलनीतील रहिवासी अजमत खान हे बांधकाम मजूर आहेत. त्यांच्या दहा बाय दहा जागेवर त्यांनी दोन खोल्यांचे घर बांधले. या घराच्या गच्चीवर संरक्षक भिंत बांधण्यासाठी त्यांनी मजूर नाक्यावरून संजय देहाडे यांना ६ जानेवारी रोजी सकाळी रोजंदारीवर नेले. तेथे काम करीत असताना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास संजय हे दुसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली रस्त्यावर पडले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. बेगमपुरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार तायडे हे तपास करीत आहेत.