शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती बायोगॅस बांधा; २२ हजारांपर्यंत अनुदान मिळवा

By बापू सोळुंके | Updated: August 29, 2024 19:41 IST

काय आहे सेंद्रिय खत व्यवस्थापन योजना ?

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारकडून घरगुती बायोगॅस उभारण्यासाठी जवळपास २२ हजारांपर्यंत अनुदान दिले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील दोन वर्षांत सुमारे २४० जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेत स्वयंपाकाचा गॅस, तर मिळतोच शिवाय विविध पिकांना उपयुक्त असे सेंद्रिय खतही उपलब्ध होते. यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

काय आहे सेंद्रिय खत व्यवस्थापन योजना ?बायोगॅस तयार करण्यासाठी शेणखत, काडी, कचरा टाकला जातो. हा कचरा आणि शेणखत, बायोगॅसमध्ये कुजते आणि यातून गॅसची निर्मिती होती. काही दिवसांनंतर कुजलेल्या स्लरीचे रूपांतर उत्तम अशा सेंद्रिय खतामध्ये होते. हे सेंद्रिय खत विविध पिकांना उपयुक्त असते.

अर्ज कसा करणार ? बायोगॅस योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात शेतकरी, शेतमजूर अर्ज करू शकतात. बायोगॅस बांधून झाल्यानंतर पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी यांना कळवूून तपासणी करून घ्यावी.

१४ ते २२ हजारांचे अनुदान (बॉक्स)नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत बायोगॅस बांधण्यासाठी सर्वसाधारण लाभार्थ्यांस १४ हजार ३५० रुपये केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येते, तर अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना २२ हजार रुपये अनुदान देण्यात येते. शिवाय या बायोगॅसला शौचालयाची जोडणी करण्यासाठी अतिरिक्त १६०० रुपये मिळते आणि जिल्हा परिषद उपकरातून प्रत्येकी दहा हजार रुपये छत्रपती संभाजीनगर जि.प. देते.

जिल्ह्याला १५० बायोगॅसचे उद्दिष्ट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सन २०२४-२५ वर्षासाठी १५० बायोगॅस उभारणीचे उद्दिष्टे केंद्र सरकारने दिले आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी जिल्ह्यातील ९ पंचायत समिती कार्यालयांना हे उद्दिष्ट वाटून देण्यात आले आहे.

दोन वर्षांत २४० जणांना लाभछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजूर यांनी मागील दोन वर्षांत तब्बल २४० जणांनी बायोगॅस बांधला आहे. पारंपरिक इंधनाला बायोगॅस उत्तम पर्याय म्हणून या लाभार्थ्यांना मिळाला आहे.

अर्ज करावेतनवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शेतकरी, शेतमजूर यांना बायोगॅस उभारण्यासाठी अनुदान देण्यात येते. यासोबत जि. प. उपकरातून १० हजार रुपये अनुदान दिले जाते. शेतकरी आणि शेतमजूर या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज करावे.- प्रकाश पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण