शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

लॉंग डीस्टन्स रिलेशनशिपचा फुगा फुटला; कोलकात्याहून लग्नासाठी आलेल्या मैत्रिणीला न भेटताच मित्र गावी पळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 5:57 PM

पुंडलिकनगर पोलिसांनी नातेवाईकांकडे तरुणीला सुपूर्द केले

ठळक मुद्देसोशल मिडीयावरील ओळखीतून कोलकात्याची तरुणी औरंगाबादेत२० नोव्हेंबर रोजी आई रागावल्याने ती घरातून १७ हजार रुपये घेऊन घराबाहेर पडली.

औरंगाबाद : टिकटॉक, फेसबुक आणि इंस्टाग्राम या समाजमाध्यमावर ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी ती थेट कोलकात्याहून औरंगाबादला आली. मात्र तिला टाळण्यासाठी मित्र गावी निघून गेला. ही बाब समजताच पुंडलिकनगर  पोलिसांनी तरुणीचे नातेवाईक आणि स्थानिक पोलिसांना बोलावून घेतले आणि तिला त्यांच्या स्वाधीन केले. 

कोलकाता येथील रहिवासी १६ वर्षाच्या तरुणीची (दहावीत शिकते )औरंगाबाद शहरातील एका तरुणासोबत टिक टॉक या समाज माध्यमावर ओळख झाली. टिकटॉक बंद झाल्यामुळे दोघे फेसबूक आणि इंस्टाग्राम या समाजमाध्यमाच्या मित्र झाले. यादरम्यान त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक परस्परांना दिल्याने ते व्हॉटसॲपवर चॅटिंग करीत. व्हिडिओ कॉल करून संवाद साधत. 

यातच २० नोव्हेंबर रोजी आई रागावल्याने ती घरातून १७ हजार रुपये घेऊन घराबाहेर पडली. हावडा रेल्वे जंक्शन येथून रेल्वेने ती नागपूरला आली. नागपूर येथून अकोला येथे आणि अकोल्याहून २४ रोजी औरंगाबादला पोहचली. या प्रवासादरम्यान ती तिच्या मित्रासोबत फोनवर बोलत होती. मात्र ती खरेच औरंगाबादला येईल असे त्याला वाटत नव्हते. तिने बोलतांना त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी आणि कायम येथे राहण्यासाठी आल्याचे सांगितले. यामुळे तो घाबरून गेला. तिला न भेटता तो गावी निघून गेला.

गॅरेजचालकाच्या घरी केला मुक्कामतो मुकुंदवाडी परिसरातील चारचाकी मोटार गॅरेजवर काम करतो. त्याने तिला तोच पत्ता दिला होता. यामुळे ती काल सायंकाळी गॅरेजवर पोहचली. त्याने गॅरेजमालक यांना फोन करून ती येणार आहे. मात्र तिच्यामुळे नाहक पोलिसांचे लचांड मागे लागेल या भीतीपोटी गावी गेल्याचे सांगितले. यानंतर गॅरेजचालकाने ही बाब पुंडलिकनगर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याशी संपर्क साधून तरुणीविषयी माहिती दिली. 

नातेवाईकाच्या दिले ताब्याततरुणीकडून तिच्या नातेवाईकांचा क्रमांक घेऊन सपोनि सोनवणे आणि पोलीस उपनिरीक्षक विकास खटके यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. यानंतर बंगळूरू येथे राहणारी तिची आत्या आणि आत्याचे पती विमानाने आज सकाळी औरंगाबादला आले. पोलिसांनी तिला त्यांच्या ताब्यात दिले आणि सोशल मिडियावरील आभासी प्रेमाचे डोक्यावरील भूत उतरविले. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसwest bengalपश्चिम बंगाल