शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीचा देखावा करून पळवली बीएसएनएलची १0 लाखांची केबल

By admin | Updated: December 13, 2014 00:29 IST

औरंगाबाद : भारत संचार निगम लिमिटेडची केबल चोरी करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे.

औरंगाबाद : भारत संचार निगम लिमिटेडची केबल चोरी करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. आकाशवाणीसमोरच गजबजलेल्या जालना रस्त्यावर असलेल्या भूमिगत टेलिफोन डक्टमधील दहा लाख रुपये किमतीची केबल चोरांनी कापून नेली. या घटनेमुळे चार दिवसांपासून बीएसएनएलचे इंटरनेट आणि दूरध्वनीचे सुमारे दोन हजार ग्राहक सेवेपासून वंचित झाले आहेत. बीएसएनएलने युद्धपातळीवर केबल जोडणीचे काम सुरू केले. हे काम पूर्ण होण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी लागणार आहे.बीएसएनएलने शहरात सर्वात मोठी केबल लाईन टाकलेली आहे. विशेषत: जालना रोडवर विविध ठिकाणी बीएसनएनलचे भूमिगत टेलिफोन डक्ट आहेत. अशाच प्रकारचा मोठा डक्ट आकाशवाणी कार्यालयासमोरच आहे. आकाशवाणी ते सिंचन भवनदरम्यान असलेल्या या डक्टमध्ये उतरून चोरट्यांनी २०० मीटर लांबीच्या दोन केबल चोरून नेल्या. विशेष म्हणजे त्यातील एका केबलवर ८०० व दुसऱ्या केबलवर १२०० ग्राहकांना टेलिफोन, इंटरनेटची सेवा दिली जात होती. ८ डिसेंबर २०१४ रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हत्याराने ही केबल कापून नेली. विशेष म्हणजे या दोन्ही केबल अवजड असल्याने ही चोरी करण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा चोरट्यांचा सहभाग असावा. चोरीनंतर सुमारे २००० ग्राहकांची सेवा बंद पडली. सकाळी १० वाजेनंतर ग्राहक सेवा सेंटरला टेलिफोन आणि इंटरनेट बंद पडल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या. आधी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना क्रमानुसार काम करण्याचे सांगितले; मात्र एकाच वेळी एवढ्या मोठ्या तक्रारी येत असल्याने बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आकाशवाणीसमोरील डक्ट उघडून पाहिला, तेव्हा तेथील दोन केबल कापून नेण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी दिलीप बारवाल या वरिष्ठ अधिकाऱ्याने तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.