शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गॅरेजच्या सुरक्षारक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; वाळूज महानगर हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 12:19 IST

खून करुन मारेकरी फरार; घटनास्थळी जाळपोळीचे निशाण आढळून आले

- महमुद शेखवाळूज महानगर ( छत्रपती संभाजीनगर) : नगररोडवरील बजाज कंपनीसमोर असलेल्या एका गॅरेजवर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची घटना आज सोमवारी (दि.८) सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने वाळूज महानगर हादरले. भाऊसाहेब नामदेव पडुळकर (रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज) असे मयत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी जाळपोळीचे निशाण आढळून आले आहेत.

भाऊसाहेब नामदेव पडुळकर हे मुळचे जालना जिल्ह्यातील काजळा येथील रहिवाशी असून गेल्या अनेक वर्षापासून ते कुटुंबासह वाळूजला वास्तव्यास आहेत. भाऊसाहेब पडुळकर यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी जनाबाई हिच्यासोबत दुसरे लग्न केले. दुसरी पत्नी जनाबाई हिच्यापासून त्यांना मुलगा आकाश, सोनुबाई, मोनुबाई या दोन विवाहित मुली आहेत. भाऊसाहेब पडुळकर हे गत ८ महिन्यापासून बजाज कंपनीसमोर असलेल्या अशोक मुकुंदा दाभाडे (रा. उस्मानपुर) यांच्या बाबा ट्रक बॉडी रिपेअरींग वर्क्स या गॅरेजवर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. रविवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास ते जेवणाचा डबा घेऊन गॅरेजवर नाईट शिफ्टला कामासाठी घराबाहेर पडले होते.

दगडाने ठेचून केला निर्घृण खून आज सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अशोक दाभाडे हे गॅरेजवर आले असता त्यांना बाजूच्या शेडसमोरील जागेत अत्यवस्थ सुरक्षारक्षक भाऊसाहेब पडुळकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. दाभाडे यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षारक्षक पडुळकर यांचा चेहरा दगडाने ठेचून छिन्नविच्छीन्न करण्यात आला आहे. 

घटनास्थळी जाळपोळीचे निशाण घटनास्थळी पडुळकर यांचा जेवणाचा डबा आणि मोपेडचे स्पेअरपार्टस जळालेले आढळून आले. तसेच त्यांचा मोबाइल घटनास्थळापासून दूर आढळून आला. सुरक्षारक्षक पडुळकर आणि मारेकऱ्यांमध्ये वाद झाल्यानंतर खून करण्यात आला असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. घटनास्थळ सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सातारा पोलीसांनी तपास सुरु केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादWalujवाळूज