कौर्याची परिसीमा; प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या भावाची गळा चिरून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 19:38 IST2020-04-20T19:37:23+5:302020-04-20T19:38:07+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण व पैठण पोलिसांनी २४ तासाच्या आत या खुनाचा छडा लावून मयत शिवाजी लोखंडेच्या सख्ख्या भावास अटक केली आहे.

कौर्याची परिसीमा; प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या भावाची गळा चिरून हत्या
पैठण : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून सख्खा भावानेच खुन केल्याची घटना पोलीस तपासात उघड झाली आहे.
पैठण शहरात रविवारी स्कूल बस चालक शिवाजी लोखंडे याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खुन झाल्याचे उघड झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण व पैठण पोलिसांनी २४ तासाच्या आत या खुनाचा छडा लावून मयत शिवाजी लोखंडेच्या सख्ख्या भावास अटक केली आहे. आरोपी गोरख लोखंडे हा शिवाजी लोखंडे याचा सख्खा भाऊ असून शिवाजी लोखंडेच्या पत्नी सोबत त्याचे प्रेम संबंध होते.
मयत शिवाजी विठ्ठल लोखंडे वय ४० वर्ष रा . पाचपिंपळ गल्ली , पैठण याचा अज्ञात इसमाने गळयावर धारदार शस्त्राने वार करुन खुन केल्याची घटना उघडकीस आली होती. पोलीस ठाणे पैठण येथे या प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल झाला होता. . सदर गुन्हयाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील , औरंगाबाद ग्रामीण यांच्या आदेशाने सहा पोलीस अधीक्षक गोरख भामरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंंदे , पैठण - पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाची पाहणी करुन तपासाची चक्रे फिरवली, गोपनीय माहिती आधारे तसेच तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे मयताचा लहान भाऊ गोरख विठ्ठल लोखंडे राहता जि अहमदनगर येथे राहतो.
दरम्यान,आठ दिवसांपूर्वी मयताची पत्नी मुलांसह राहता येथे गेली होती . घटनेच्या दिवशी गोरख विठ्ठल लोखंडे हा पैठण येथे आल्याची माहिती मिळाली होती , त्यावरुन पोलिसांनी गोरख लोखंडे यास ताब्यात घेतले होते . पोलिसांनी राहता येथे चौकशी केली असता गोरख लोखंडे हा दिनांक १७ रोजी सायंकाळी पाणी भरायला जातो असे सांगून घराबाहेर गेला होता , तो दिनांक १८ रोजी सकाळी ६ वा परत घरी आला होता , या आधारे गोरख लोखंडे याच्याकडे पोलिसांनी उलट तपासणी करुन त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता त्याने मयत शिवाजी लोखंडे याच्या पत्नी सोबत प्रेमसंबध होते , मयत शिवाजी लोखंडे हा त्यांच्या प्रेम संबधामध्ये अडथळा ठरत असल्याने त्याचा खुन केल्याची कबुली दिली .
पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील , अपर पोलीस अधिक्षक गणेश गावडे , सहा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख,सहा . पोलीस निरीक्षक सुदाम वारे , पोलीस उपनिरीक्षक संतोष माने , रामकृष्ण सागडे , सचिन सानप , भगतसिंग दुलत , फौजदार गफार पठाण , सुधाकर दौड , झिया चाँद , संजय काळे , प्रमोद खांडेभराड , रतन वारे , पोना राहूल पगारे , संजय भोसले पोकॉ योगेश तरमाळे , उमेश बकले , संजय तांदळे, राजू शेख भगवान सिंगल , करतार सिंगल , पोकॉ बनगे , चालक पोकॉ ढाकणे यांनी ही काामगीरी केली आहे. मयत शिवाजी लोखंडेच्या पत्नीस पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.