शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

'राज्यातील मंत्र्यांना भानावर आणणार'; मराठा आरक्षणावर महाविकास आघाडी विरोधात शिवसंग्रामचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 11:57 AM

Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ येत्या ७ फेब्रुवारी रोजी जालना येथे शिवसंग्रामच्या वतीने एल्गार मेळावा

ठळक मुद्देमराठा आंदोलनाची दखल न घेतल्याने महाविकास आघाडी विरोधात घेणार मेळावे  सरकारने साष्टपिंपळगावच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावीपाच ऐवजी नऊ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणप्रश्नी सुनावणी व्हायला हवी

औरंगाबाद: जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव या गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल ठाकरे सरकारने व जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी न घेतल्याच्या निषेधार्थ येत्या ७ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा जालना येथे शिवसंग्रामच्या वतीने एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आज येथे पत्रपरिषदेत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, हा मेळावा आक्रमक राहील. याव्दारे मराठा समाजाचा असंतोष एकवटण्यात येईल. तेथे काय करायचे हे आता मी सांगणार नाही. नांदेड येथे अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात, नागपूरला नितीन राऊत व अनील देशमुख यांच्या विरोधात, मुंबईत वर्षा गायकवाड आणि अनील परब यांच्या विरोधात आणि बारामती येथे शरद पवार यांच्या विरोधात एल्गार मेळावे घेण्याची घोषणा विनायक मेटे यांनी यावेळी केली.

मंत्र्यांना भानावर आणण्यासाठी व सत्तेमुळे आलेला त्यांचा माज उतरविण्यासाठी हे एल्गार मेळावे आहेत. मराठ्यांच्या जीवावर हे मोठे होतात, संपत्ती कमावतात, साम्राज्य निर्माण करतात आणि आता हे मंत्री मराठ्यांच्या जीवावर उठले आहेत. आपापल्या खात्यात नोकरभरती सुरू करणारे मंत्री हे मराठा समाजाचे मारेकरी होत, अशी संतप्त प्रतिक्रिया मेटे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, शरद पवार यांनी या प्रश्नात थोडे जरी लक्ष घातले तरी हा प्रश्न मार्गी लागेल. पण ते का लक्ष घालत नाही, हे कळत नाही. सरकारने साष्टपिंपळगावच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, नोकरभरती पुढे ढकलण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षण सुनावणीत हरिश साळवे यांना सहभागी करून घ्यावे अशा मागण्या विनायक मेटे यांनी केल्या.

पाच ऐवजी नऊ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणप्रश्नी सुनावणी व्हायला हवी होती. राज्य सरकारने आम्हाला एकत्रित बसवले नाही. काय करा,काय करू नका हे सांगितले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. किशोर चव्हाण, सलीम पटेल, बाळासाहेब भगनुरे,लक्ष्मण नवले, सचिन मिसाळ, विराज जोगदंड, नागेश दांडाईत,महेश जोगदंड, अरविंद कळकेकर,पंकज उदरभरे आदींची या पत्रपरिषदेस उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादVinayak Meteविनायक मेटेMaratha Reservationमराठा आरक्षण