लाचखोर कर्मचारी-अधिकारी धास्तावले
By Admin | Updated: June 26, 2014 00:38 IST2014-06-26T00:25:07+5:302014-06-26T00:38:19+5:30
मानवत : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सततच्या कारवाईमुळे लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यात दहशत निर्माण झाली आहे.

लाचखोर कर्मचारी-अधिकारी धास्तावले
मानवत : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सततच्या कारवाईमुळे लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यात दहशत निर्माण झाली आहे. मागील एका वर्षात तालुक्यातील पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
शासकीय कार्यालय कोणतेही असो विना देवाण-घेवाणीचा कोणताही कागद एका टेबलावरून दुसऱ्या टेबलाकडे जात नाही. यामध्ये तहसील, पं़ स़, ऩ प़ आदी कार्यालये यात समाविष्ट असतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस आपले किरकोळ कामे घेऊन कार्यालयात खेटे मारतात. तहसील कार्यालयात उत्पन्नाचे प्रमाणपत्र असो, सातबारा, फेरफारची नक्कल असो, ऩ प़ त पीटीआरची नक्कल असो, बांधकाम परवाना आणि अशाच प्रकारची किरकोळ कामे वेळेवर होत नाहीत. आपली दैनंदीन कामे देखील प्रत्येक माणसाला कार्यालयात जाणे शक्य होत नाही. सर्वसामान्य माणसांच्या या असहाय्यतेचा फायदा घेऊन शासकीय कर्मचारी हात पुढे करतात आणि सर्वसामान्य माणूस आपला होणारा त्रास कळावा म्हणून न कळतच आपलाही हात पुढे करतो आणि भ्रष्टाचाराचा रथ क्षणाक्षणा आणि कणाकणाने पुढे सरकतो. ज्या माणसांना आपल्या हक्क, कर्तव्यांची जाणीव झाली त्या माणसांना आपल्या न्याय हक्कासाठी पैसे देणे आवडत नाही आणि मग त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा आधार घ्यावा लागतो. हे पाऊल कोणताही सर्वसामान्य नागरिक सहजपणे उचलत नाही तर त्याला एखाद्या क्षुल्लक कामासाठी माराव्या लागणाऱ्या चकरा माणसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे खेचून नेते. (वार्ताहर)
मागच्या सहा महिन्यात एक तलाठी, पोलिस, सहाय्यक पोलिस निरीक्षक, तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी आणि आता पंचायत समितीचे अधिकारी सर्वसामान्य माणसात जागरुकता आल्याने लाचखोर अधिकारीही आता धास्तावले आहेत.