सेतूच्या निविदा प्रक्रियेला ‘ब्रेक’
By Admin | Updated: August 10, 2014 02:22 IST2014-08-10T02:06:04+5:302014-08-10T02:22:31+5:30
व्यंकटेश वैष्णव, बीड जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांच्या निविदा वर्षभरापुर्वी काढण्यात आल्या. कंत्राट एका नवीन कंपनीला मिळाले. महसूल राज्यमंत्र्याच्या आदेशानुसार

सेतूच्या निविदा प्रक्रियेला ‘ब्रेक’
व्यंकटेश वैष्णव, बीड
जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांच्या निविदा वर्षभरापुर्वी काढण्यात आल्या. कंत्राट एका नवीन कंपनीला मिळाले. महसूल राज्यमंत्र्याच्या आदेशानुसार नव्या संस्थेला ताबा देण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे़ औरंगाबाद येथील जे़ एम़ इन्फोटेक संस्थेने मंत्रालयात बीडच्या टेंडर प्रक्रिये संदर्भात आक्षेप नोंदवला होता़ यावरून ७ आॅगस्ट रोजी महसूल व वन विभागाने हा निर्णय घेतला.
डिसेंबर २०१३ च्या दरम्यान बीड जिल्हयातील सेतू केंद चालवत असलेल्या कंपनीचा करार संपला होता़ यावरून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी टेंडर मागवून नविन टेंडर प्रोसेस केली होती़ यामध्ये आलेल्या सर्व टेंडरची पडताळणी करून पुणे येथील पॅटॉगॉन कंपनीला हे टेंडर देण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र दरम्यानच्या काळात औरंगाबाद येथील जे़ एम़ के़ इन्फोटेक कंपनीने मंत्रालयात महसूल व वन विभाग यांच्याकडे टेंंडर बाबत अपिल करून चुकीच्या पध्दतीने टेंडर दिले जात असून टेंडरची फेर पडताळणी करण्याची मागणी केली होती़ या मागणी वरून ७ आॅगस्ट २०१४ रोजी महसूल व वन विभागाने बीड जिल्हयात दिलेल्या सेतूच्या टेंडरची फेर तपासणी आयुक्त कार्यालया मार्फत करावी़ असे आदेश दिले आहेत़ तसेच ९ जुलै २०१४ रोजीची आदेशांना, स्थगिती देण्यात येत असल्याचे शासनाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे़ या सुचना महसूल राज्यमंत्री धस यांच्या आदेशानुसार ७ आॅगस्ट रोजी महसूल विभागाने संबंधीत जिल्हा सेतू समितीच्या अध्यक्षांना सूचना दिल्या आहेत़