कृषिपंपांची वीज खंडित करा

By Admin | Updated: May 25, 2014 01:06 IST2014-05-25T00:45:21+5:302014-05-25T01:06:14+5:30

लोहारा : तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्प कार्यक्षेत्रात येणार्‍या कृषिपंपाचे कनेक्शन खंडित करण्याचे आदेश तहसील प्रशासनाच्या वतीने वीज कंपनीच्या अभियंत्यांना देण्यात आले आहेत.

Break the electricity of agriculture | कृषिपंपांची वीज खंडित करा

कृषिपंपांची वीज खंडित करा

लोहारा : तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्प कार्यक्षेत्रात येणार्‍या कृषिपंपाचे कनेक्शन खंडित करण्याचे आदेश तहसील प्रशासनाच्या वतीने वीज कंपनीच्या अभियंत्यांना देण्यात आले आहेत. लोहारा तालुक्यातील माकणी निम्न तेरणा हा प्रकल्प सर्वात मोठा आहे. या प्रकल्पामध्ये आजघडीला १८ दलघमी इतका पाणीसाठा आहे. मात्र, भविष्यातील टंचाईचे संकट लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाने येथील तहसील प्रशासनाला एका पत्राद्वारे धरण क्षेत्रातील कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिले होते. ही पत्र ३ मार्चला आले होते. त्यावर तहसीलदार ज्योती चौहाण यांनी १५ मे रोजी वीज वितरण कंपनी सास्तूर युनिटचे (क्र.२) शाखा अभियंत्यांना पत्र देऊन कृषिपंपाची वीजजोडणी खंडित करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, माकणी धरणक्षेत्र परिसरात दहा विद्युत ट्रान्सफार्मर आहेत. यापूर्वीच चार ट्रान्सफार्मरवरील कृषिपंपांची वीज तोडण्यात आली आहे. त्यानंतर मागील आठवड्यात तीन ट्रान्सफार्मरवरील वीजजोडणी तोडली आहे. (वार्ताहर)माकणी निम्न तेरणा प्रकल्पावरील तीन ट्रान्सफार्मवरील कृषी पंपाचा वीजपुरवठा दोन दिवसांमध्ये खंडित करण्यात येणार आहे. खंडित केलेली वीज शेतकर्‍यांनी पुन्हा जोडली जावू नये, म्हणून तलाठ्याला सोबत घेवून पंचनामा केला जाणार आहे. याउपरही जे शेतकरी अनधिकृतपणे विद्युतपंप सुरू करतील त्यांच्याविरूद्ध पोलिस कारवाई करण्यात येईल, असे कनिष्ठ अभियंता डी. आर. गोसावी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तलावातून अनधिकृतरीत्या पाण्याचा होणारा उपसा आणि भविष्यातील टंचाईचे संकट लक्षात घेवून कृषिपंप बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावर नजर ठेवण्यासाठी नायब तहसीलदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथक गठीत करण्यात आले आहे, असे तहसीलदार ज्योती चौहाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.लोहारा तालुक्यात माकणी धरणासोबतच अन्य प्रकल्पातही बर्‍यापैैकी पाणीसाठा आहे; परंतु धरण क्षेत्रातील शेतकरी तलावातील पाणी शेतीसाठी वापरत आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर सदरील मोटारी बंद करण्यासाठी तहसीलदारांच्या निर्देशानुसार पथक गठीत करण्यात आले आहे.

Web Title: Break the electricity of agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.