सी.ए.च्या पदवीला ब्रँड व्हॅल्यू

By Admin | Updated: June 29, 2015 00:33 IST2015-06-29T00:33:07+5:302015-06-29T00:33:07+5:30

औरंगाबाद : दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंटस् आॅफ इंडियाचा सी.ए. अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय निकषावर सिद्ध झाला आहे. यामुळेच सीएची पदवी ब्रँड व्हॅल्यू बनली आहे.

Brand Value for CA degree | सी.ए.च्या पदवीला ब्रँड व्हॅल्यू

सी.ए.च्या पदवीला ब्रँड व्हॅल्यू


औरंगाबाद : दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंटस् आॅफ इंडियाचा सी.ए. अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय निकषावर सिद्ध झाला आहे. यामुळेच सीएची पदवी ब्रँड व्हॅल्यू बनली आहे. परिणामी याला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळाली आहे. दृढइच्छाशक्ती, कठोर मेहनत व सदैव सकारात्मक विचारांच्या जोरावरच विद्यार्थी सी.ए. बनू शकतो, असे मौल्यवान मार्गदर्शन आयसीएआयचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप शहा यांनी केले.
लोकमत आणि ‘आय.सी.ए.आय’च्या औरंगाबाद शाखेच्या वतीने ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ क्षेत्रात करिअर व संधी’ या विषयावर आयोजित शिबिरात ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे सहप्रायोजक आर.जे.फाऊंडेशन हे होते. रविवारी सायंकाळी लोकमत भवन येथील शिबिराला सी.ए. होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी हॉल भरून गेला होता. हॉल अपुरा पडल्याने शेजारील हॉलमध्येही बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे स्क्रीनवर कार्यक्रम दाखविण्यात येत होता. व्यासपीठावर आयसीएआयच्या औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सी.ए पंकज कलंत्री, आर.जे. फाऊंडेशनचे अध्यक्ष राघवेंद्र जोशी, लोकमतचे संपादक सुधीर महाजन, वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला व सहउपाध्यक्ष संदीप बिष्णोई यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयदीप शहा म्हणाले की, करिअर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर बहुपर्याय उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय या क्षेत्रात उत्तम करिअर घडू शकते. तसेच चार्टर्ड अकाऊंटंट झाल्यावरही तेवढेच उत्तम करिअर बनू शकते. १२ वी नंतर पुढील पाच ते सहा वर्षात व्यावसायिक शिक्षणाचे जे ज्ञान प्राप्त केले, त्याचा प्रभाव पुढील ४० ते ४५ वर्षाच्या करिअरवर पडू शकतो. याचा विचार करूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात पाऊल टाका. करिअर निवडताना बहुपर्याय, आपले आवडीचे क्षेत्र व भविष्यातील संधीचा आवश्यक विचार करावा. सीए बनण्यासाठी सीपीटी, आयपीसीसी व सी.ए. अंतिम अशा तीन परीक्षा द्याव्या लागतात. कॅनडा, आॅस्ट्रेलिया, आयर्लंड, इंग्लंड यासारख्या देशांशी आयसीएआयने सामंजस्य करार केल्याने भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातही सीए होण्याचे स्वप्नपूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सीएची परीक्षा देताना शैक्षणिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्ट स्किल्सही मिळते. या कोर्सची फीस इतर व्यावसायिक शिक्षणापेक्षा कमी असते. यामुळे मध्यमवर्गीयांतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही सीए होता येते. तसेच आर्टिकलशिप दरम्यान विद्यावेतनही मिळते, अशी माहिती त्यांनी दिली.
इंजिनिअरिंग, मेडिकलसोबतच विद्यार्थ्यांचा कल कॉमर्सकडे वाढल्याचे राघवेंद्र जोशी यांनी सांगितले. शेवटी ओमप्रकाश केला यांनी पालकांच्या वतीने शहा यांना प्रश्न विचारले. यानंतर काही पालकांनी व विद्यार्थ्यांनी शंका विचारल्या. त्यास शहा यांनी सविस्तर उत्तरे दिली. संचालन गणेश तरटे यांनी केले.

Web Title: Brand Value for CA degree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.