शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

वसमत शहरात विजेच्या धक्क्याने मुलगा दगावला

By admin | Updated: June 19, 2016 23:20 IST

वसमत : एका घरातून दुसऱ्या घरात वीजजोडणी दिलेल्या वायरमुळे पत्र्यात वीज प्रवाह उतरला व पत्र्याला बांधलेल्या तारेला गल्लीतील नऊ वर्षीय मुलाने स्पर्श केल्याने विजेचा धक्का लागून तो ठार झाला.

वसमत : एका घरातून दुसऱ्या घरात वीजजोडणी दिलेल्या वायरमुळे पत्र्यात वीज प्रवाह उतरला व पत्र्याला बांधलेल्या तारेला गल्लीतील नऊ वर्षीय मुलाने स्पर्श केल्याने विजेचा धक्का लागून तो ठार झाला. वसमत येथील बुधवारपेठेत ही घटना रविवारी दुपारी घडली. मयताच्या पालकांनी सदर इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वसमत पोलिस ठाण्यात ठाण मांडले होते. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.वसमत शहरातील बुधवारपेठ भागातील एकनाथ लक्ष्मण बोद्दलवार हा नऊ वर्षीय मुलगा खेळत असताना गल्लीतील एका घरावर बांधलेल्या लोखंडी ताराला त्याचा स्पर्श झाला. या तारेत वीज प्रवाह उतरलेला असल्याने स्पर्श होताच तो जागीच ठार झाला. रस्त्याच्या दुसऱ्या कडेला असलेल्या एका घरातून रस्ता ओलांडून दुसऱ्या घरात वायरद्वारे वीजपुरवठा करण्यात आलेला आहे. ही वायर कट झाल्याने पत्र्यात वीज प्रवाह उतरला व पत्र्यावर ओझे ठेवण्यासाठी बांधलेल्या दगडाच्या तारांत वीजप्रवाह उतरला व ही घटना घडल्याची मयत मुलाच्या पालकांची तक्रार आहे. धोकादायक पद्धतीने वीजपुरवठा करुन मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मयत मुलाचे पालक व नातेवाईक वसमत पोलिस ठाण्यात जमा झाले होते. मुलाच्या आईच्या आक्रोशाने पोलिस ठाणे दणाणून गेले होते. याप्रकरणी श्याम बोद्दलवार यांच्या तक्रारीवरुन मुलाच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी मिर्झा जबीउल्ला बेग, इमरान मिर्झा बेग, सरफराज मिर्झा बेग, इरफान बेग (सर्व रा.बुधवारपेठ, वसमत) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास फौजदार वर्षा डहाळे, के. बी. चव्हाण आदी करीत आहेत. (वार्ताहर)