दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाण करणाऱ्या दोघांना कारावास व दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:15 IST2019-02-04T23:15:17+5:302019-02-04T23:15:44+5:30

औरंगाबाद : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून लोखंडीपट्टीने कानावर वार करून गंभीर जखमी करणारे भारत ऊर्फ जॉन शंकरतीर्थे आणि ...

 Both the beating and imprisonment are not allowed to pay for liquor | दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाण करणाऱ्या दोघांना कारावास व दंड

दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाण करणाऱ्या दोघांना कारावास व दंड

ठळक मुद्देफिर्यादीला तीन हजार रुपये नुकसानभरपाईचाही आदेश

औरंगाबाद : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून लोखंडीपट्टीने कानावर वार करून गंभीर जखमी करणारे भारत ऊर्फ जॉन शंकरतीर्थे आणि शुभम भिकुलाल जाट या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी प्रत्येकी सहा महिने सश्रम कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी तीन हजार रुपये फिर्यादीला नुकसानभरपाईपोटी देण्याचेही आदेशात म्हटले आहे.
यासंदर्भात बाबासाहेब शामराव शिंदे (२२, रा. जयभवानीनगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती .

Web Title:  Both the beating and imprisonment are not allowed to pay for liquor