सातार्‍यात नाल्याच्या कडेला बोअरवेलच्या रांगा

By Admin | Published: May 13, 2014 12:37 AM2014-05-13T00:37:58+5:302014-05-13T00:56:44+5:30

औरंगाबाद : सातारा परिसरात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने येथील रहिवाशांनी अनेक बोअरवेल नदी- नाल्याच्या कडेला पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी टाकले आहेत.

Borewell Row near Satara | सातार्‍यात नाल्याच्या कडेला बोअरवेलच्या रांगा

सातार्‍यात नाल्याच्या कडेला बोअरवेलच्या रांगा

googlenewsNext

औरंगाबाद : सातारा परिसरात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने येथील रहिवाशांनी अनेक बोअरवेल नदी- नाल्याच्या कडेला पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी टाकले आहेत. कॉलनी व नगर, कॉम्प्लेक्सपर्यंत ते पाणी जलवाहिनीने वाहून आणले आहे. हीच संकल्पना ग्रामपंचातीने राबविल्यास पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने सातारा- देवळाई परिसरात असंख्य बोअर घेण्याचा सपाटा सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दाद मागितली; परंतु त्यांच्या मागणीकडे सतत कानाडोळा केला गेला आहे. वसाहत मोठ्या प्रमाणात वाढली असून, नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा मिळत नाहीत. बिल्डर्सने या परिसरात घरकुल योजना राबवली. ती घरकुले चढ्या भावात विकून ते मोकळे झाले आहेत. बोअरवेलने तळ गाठल्याने आजमितीला स्थानिकांना पाण्यासाठी झुंज द्यावी लागत आहे. येथील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यास कोणीही पुढे येताना दिसत नसल्याची खंत स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. टँकर आणि बोअरवेल सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना बोअरवेल किंवा टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. खाजगी टँकरला जास्तीचे पैसे मोजण्यापेक्षा कॉलनी व नगर, कॉम्प्लेक्समधील नागरिकांनी एकत्र येऊन पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी सार्वजनिक बोअर घेतले आणि पाणी कॉलनीपर्यंत वाहून नेले आहे. पाण्यात जास्तीचे क्षार असल्याने पाणी फिल्टर करण्याची नितांत गरज आहे. नागरिकांनी स्वखर्चाने छोटी उपकरणे घरात बसविली आहेत. तंत्रज्ञनगर, रणजितनगर, राजधानी कॉलनी परिसरातील अनेकांनी नाल्याच्या कडेला एकाच ठिकाणी बोअर घेतले आहे.

Web Title: Borewell Row near Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.