पहिल्याच दिवशी पुस्तके अन फुल !
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-13T23:53:23+5:302014-06-14T01:19:29+5:30
बीड : शाळेचा पहिला दिवस आता ‘बूक डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे़ पहिल्या दिवशी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुजींकडून पुस्तके व फूल देऊन स्वागत होणार आहे़
पहिल्याच दिवशी पुस्तके अन फुल !
बीड : शाळेचा पहिला दिवस आता ‘बूक डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे़ पहिल्या दिवशी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुजींकडून पुस्तके व फूल देऊन स्वागत होणार आहे़ जिल्ह्यात तब्बल ३ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा लाभ मिळणार आहे़
पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानकडून मोफत पुस्तके दिली जातात़ पुस्तकांअभावी एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच अनुदानित खाजगी शाळांमधील मोफत पुस्तके दिली जातात़ औरंगाबाद येथील विभागीय भांडारमधून तालुकास्तरावर पुस्तके पोहोच केली जातात़
१६ जून रोजी शाळांना सुरुवात होत आहे़ पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ८५ हजार १०२ इतकी आहे़ या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तके पुरविण्यात येणार आहेत़ सर्व विषयांची पुस्तके उपलब्ध झाली आहेत़ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडावीत असे नियोजन केले असल्याचे शिक्षणाधिकारी (प्रा़) भास्कर देवगुडे यांनी सांगितले़ शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे़ त्यासाठी संबंधित गावातील पदाधिकारी, अधिकारी व पालक यांना निमंत्रित केले जाईल़ सर्व गटशिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक यांना याबाबत सूचना केल्या असल्याचेही देवगुडे म्हणाले़
अशी आहे विद्यार्थी संख्या
पहिली ते पाचवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थीसंख्या २ लाख ४६ हजार ८६८ इतकी आहे़ अंबाजोगाई- २६६७१, आष्टी- २११६२, बीड (ग्रामीण) - २७३११, धारुर- ११४२२, गेवराई- ३१६०१, केज- २१३९७, माजलगाव- २३९७५, परळी- २८६७३, पाटोदा- १०७११, शिरुर- ९९३५, वडवणी- ८२०० बीड (शहर) २५८१० इतक्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळतील़ तर सहावी ते आठवी उच्चप्राथमिक शाळेतील विद्यार्थी संख्या १ लाख ३८ हजार २३४ इतकी आहे़ अंबाजोगाई- १६५७४, बीड (ग्रामीण)- १५२१८, आष्टी- १२९२३, धारुर- ५२१७, गेवराई- १६०६२, केज- १२५२५, माजलगाव- १२३८४, परळी- १५३६२, पाटोदा- ६३५५, शिरुर- ५७७२, वडवणी- ४४५०, बीड (शहर)- १५४०२ इतकी विद्यार्थी संख्या आहे़ (प्रतिनिधी)