औरंगाबाद : वेळ दुपारची १२.३० वाजेची... घाटी रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयाचा फोन खणखणला... फोन उचलताच तिकडून ‘कॉलेजमध्ये बम फटनेवाला हैं, जितने लोगो को बचा सकते हो, बचा लो’ अशी धमकी मिळाली अन् या धमकीने अख्खे घाटी रुग्णालय हादरून गेले. क्षणात अख्खे महाविद्यालय खाली करण्यात आले. पोलीस, बॉम्बशोधक पथक दाखल झाले. तपासणीअंती तो खोडसाळपणाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला...घाटी रुग्णालयाच्या आवारातच नर्सिंग कॉलेज आहे. दुपारी क्लास नित्याप्रमाणे सुरू होते. १२.३० वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या लँडलाईनवर फोन आला. तो प्राध्यापक सुजाता पालवे यांनी उचलला. तिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने तुम्ही प्राचार्य बोलता का, अशी विचारणा केली, प्राचार्य गावी गेलेले आहेत, असे सांगितल्यानंतर त्याने कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवला आहे, काही क्षणांत धमाका होईल.जितक्या लोकांना वाचवू शकता वाचवा, असे सांगून फोन बंद केला. प्राध्यापक पालवे यांनी तात्काळ ही माहिती महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सर्व विद्यार्थी धावत बाहेर आले. घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी हे मोठा पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बशोधक व नाशक पथकही महाविद्यालयात पोहचले. काट्याबरोबर वाढत होती धडधडफोन करणाऱ्या व्यक्तीने दुपारी २.३० वाजता बॉम्ब फुटेल, असे म्हटलेले होते. पोलिसांनी महाविद्यालय आणि आवाराचा कोनान्कोना तपासणी करण्यास सुरुवात केली. जसजसा घड्याळाचा काटा अडीचच्या दिशेने सरकत होता तसतशी सर्वांच्याच हृदयाची धडधड वाढत चाली होती. कारण या महाविद्यालयाच्या बाजूलाच घाटी रुग्णालय, अनेक महाविद्यालये आहेत. त्यामुळे दुर्दैवाने बॉम्ब असला तर... या भीतीने सर्वांचाच श्वास रोखला होता. अखेर अडीचचा ठोका पडला अन् तपासणीही पूर्ण झाली. कोठेच काही सापडले नाही. तेव्हा तो फोन खोडसाळपणाच आहे, हे स्पष्ट झाले.गारखेड्यातून केला फोनआरोपीने प्राचार्यांच्या मोबाईलवर फोन केल्यामुळे फोन कोणत्या क्रमांकावरून केला, हे स्पष्ट झाले होते. इकडे बॉम्ब तपासणी करीत असतानाच पोलिसांनी फोन कोठून आला आणि तो कुणाचा आहे, याची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. तपासाअंती तो गारखेड्यातील पीसीओवरून फोन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या अज्ञात आरोपीविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘बम फटनेवाला है... जितक्या लोकांना वाचवू शकता वाचवा, असे सांगून फोन बंद केला. प्राध्यापक पालवे यांनी तात्काळ ही माहिती महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सर्व विद्यार्थी धावत बाहेर आले. घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी हे मोठा पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बशोधक व नाशक पथकही महाविद्यालयात पोहचले. काट्याबरोबर वाढत होती धडधडफोन करणाऱ्या व्यक्तीने दुपारी २.३० वाजता बॉम्ब फुटेल, असे म्हटलेले होते. पोलिसांनी महाविद्यालय आणि आवाराचा कोनान्कोना तपासणी करण्यास सुरुवात केली. जसजसा घड्याळाचा काटा अडीचच्या दिशेने सरकत होता तसतशी सर्वांच्याच हृदयाची धडधड वाढत चाली होती. कारण या महाविद्यालयाच्या बाजूलाच घाटी रुग्णालय, अनेक महाविद्यालये आहेत. त्यामुळे दुर्दैवाने बॉम्ब असला तर या भीतीने सर्वांचाच श्वास रोखला होता. अखेर अडीचचा ठोका पडला अन् तपासणीही पूर्ण झाली. कोठेच काही सापडले नाही. तेव्हा तो फोन खोडसाळपणाच आहे, हे स्पष्ट झाले.गारखेड्यातून केला फोनआरोपीने प्राचार्यांच्या मोबाईलवर फोन केल्यामुळे फोन कोणत्या क्रमांकावरून केला, हे स्पष्ट झाले होते. इकडे बॉम्ब तपासणी करीत असतानाच पोलिसांनी फोन कोठून आला आणि तो कुणाचा आहे, याची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. तपासाअंती तो गारखेड्यातील पीसीओवरून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या अज्ञात आरोपीविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘बम फटनेवाला है... बचा सकते हो तो बचा लो!’
By admin | Updated: November 29, 2014 00:31 IST
औरंगाबाद : वेळ दुपारची १२.३० वाजेची... घाटी रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयाचा फोन खणखणला... फोन उचलताच तिकडून ‘कॉलेजमध्ये बम फटनेवाला हैं, जितने लोगो को बचा सकते हो, बचा लो’ अशी धमकी मिळाली
‘बम फटनेवाला है... बचा सकते हो तो बचा लो!’
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}