रांजणगावात तरुणाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:23 IST2019-05-27T21:23:49+5:302019-05-27T21:23:57+5:30
रांजणगाव शेणपुंजी येथे सोमवारी (दि.२७) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तरुणाचा मृतदेह आढळून आला.

रांजणगावात तरुणाचा मृतदेह आढळला
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे सोमवारी (दि.२७) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तरुणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगर फाट्याजवळील ग्रामपंचायतीच्या व्यवसायिक गाळ्यालगत सोमवारी सायंकाळी ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला.
डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. भारत जाधव असे मृताचे नाव असून, असून तो वाळूज एमआयडीसीतील एका ठेकेदाराकडे काम करत असल्याचे समजते. परिसरातील एका खानावळीवर जेवण करुन तो कुठेही मुक्काम करायचा, अशी माहिती मिळाली आहे. संबंधित ठेकेदाराकडून माहिती घेतली जात असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले.