परभणीतील 'त्या' तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनसाठी छ. संभाजीनगरमध्ये, घाटीत तणावपूर्ण वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 21:14 IST2024-12-15T21:14:33+5:302024-12-15T21:14:43+5:30

परिसरात सध्या मोठा पोलिस बंदोबस्त आहे.

body of 'that' youth from Parbhani has been taken to Chhatrapati Sambhajinagar for autopsy, a tense atmosphere prevails in the valley. | परभणीतील 'त्या' तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनसाठी छ. संभाजीनगरमध्ये, घाटीत तणावपूर्ण वातावरण

परभणीतील 'त्या' तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनसाठी छ. संभाजीनगरमध्ये, घाटीत तणावपूर्ण वातावरण

छत्रपती संभाजीनगर :परभणी येथे संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार समोर आला होता. याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले.  दरम्यान आता या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला.

परभणी आंदोलनातील आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू

सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (३६, रा. भोसरी, जि. पुणे, ह.मु.शंकर नगर, परभणी) असे मयत तरुणाचे नाव आहे. घाटीत शवविच्छेदनगृह परिसरात आंबेडकरी चळवळीतील नेते, पदाधिकारी यांच्यासह युवकांनी मोठी गर्दी केली आहे. परिसरात सध्या मोठा पोलिस बंदोबस्त आहे.

Web Title: body of 'that' youth from Parbhani has been taken to Chhatrapati Sambhajinagar for autopsy, a tense atmosphere prevails in the valley.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.