बेपत्ता मुलाचे दोन दिवसांनी विहिरीत प्रेत आढळले; बहिणीसोबत भांडण झाल्याने सोडले होते घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:32 IST2020-06-27T17:30:45+5:302020-06-27T18:32:39+5:30

बहिणीसोबत झालेल्या किरकोळ भांडणानंतर  घरातून निघून गेला होता

The body of the missing boy was found in the well two days later; He had left the house due to a quarrel with his sister | बेपत्ता मुलाचे दोन दिवसांनी विहिरीत प्रेत आढळले; बहिणीसोबत भांडण झाल्याने सोडले होते घर

बेपत्ता मुलाचे दोन दिवसांनी विहिरीत प्रेत आढळले; बहिणीसोबत भांडण झाल्याने सोडले होते घर

औरंगाबाद: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १२ वर्षीय मुलाचे प्रेत आज सकाळी हर्सूल परिसरातील पाण्याने भरलेल्या विहिरीत तरंगताना आढळून आले .  

कृष्णा रामू मकळे (१२ , रा . अंबरहिल ,जटवाडा रोड ) असे मयत मुलाचे नाव आहे . याविषयी प्राप्त माहिती अशी की ,  कृष्णा हा २५ जून रोजी दुपारी बहिणीसोबत झालेल्या किरकोळ भांडणानंतर  घरातून निघून गेला होता . दिवसभर तो घरी परतला नाही. यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता त्यांना तो नजरेस पडला नाही. 

यामुळे त्याची आई नंदा मकळे यांनी कृष्णाचे कुणीतरी अपहरण केल्याची तक्रार हर्सूल ठाण्यात नोंदविली होती . पोलीस त्याचा शोध घेत असताना आज सकाळी ८ वाजता हर्सूल परिसरातील वीटभट्टी जवळील गफ्फार मेवात यांच्या शेतातील विहिरीत कृष्णाचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले . यानंतर त्याला बेशुद्धावस्थेत विहिरीतून काढून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले . तेथील डॉक्टरांनी कृष्णाला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

Web Title: The body of the missing boy was found in the well two days later; He had left the house due to a quarrel with his sister