‘त्या’ विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:06 IST2021-05-05T04:06:11+5:302021-05-05T04:06:11+5:30
सोमवारी सकाळी बिडकीन परिसरातील शेतकरी किशोर रामभाऊ धरणे यांना त्यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात इसमाचे प्रेत आढळून ...

‘त्या’ विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली
सोमवारी सकाळी
बिडकीन परिसरातील शेतकरी किशोर रामभाऊ धरणे यांना त्यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आले. याबाबत त्यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात हलविला. मृतदेह आढळून आलेल्या विहिरीजवळच उभ्या असलेल्या दुचाकी क्रमांकाच्या (एम.एच. २० सी.ई. ७८९०) नोंदणी आधारे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले.
नितीन बनकर बेपत्ता असल्याची तक्रार औरंगाबाद शहरातील जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून तो दुचाकी घेऊन घरातून निघून गेला होता. बिडकीन येथील विहिरीत त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता स.पो.नि. संतोष माने यांनी वर्तविली.