नाव आले पण प्राण गेले़़़़!
By Admin | Updated: August 14, 2014 01:58 IST2014-08-14T01:26:41+5:302014-08-14T01:58:27+5:30
राम लंगे , वडवणी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत आलेल्या पद्मीनबाई जावळे या वृध्देचा पायऱ्यावरच मृत्यू झाल्याची घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती़ आता

नाव आले पण प्राण गेले़़़़!
राम लंगे , वडवणी
निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत आलेल्या पद्मीनबाई जावळे या वृध्देचा पायऱ्यावरच मृत्यू झाल्याची घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती़ आता आणखी एका वृध्देने निराधार योजनेच्या लाभाची प्रतीक्षा करीत प्राण सोडले़ या वृध्देने लाभार्थ्यांच्या यादीत नाव लागण्यासाठी दोन वर्षे संघर्ष केला़़़सरकारी यंत्रणेला जाग आली़़़नावही लागले परंतु त्याचा लाभ घेणे तर दूरच़़़परंतु ते पहाण्यापूर्वीच वृध्देने शेवटचा श्वास घेतला़
रुक्मिणबाई सूर्यभान सरगर (वय ८०, रा़ कान्हापूर, ता़ वडवणी) असे त्या दुर्दैवी वृध्देचे नाव आहे़ रुक्मिणबाई सरगर यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले़ रोज लोकांच्या शेतात मोलमजुरी करुन त्यांनी आयुष्याच्या सायंकाळपर्यंतचा प्रवास केला़ चार मुले, दोन मुली असा भरलेला संसाऱ मुली लग्न होऊन सासरी नांदण्यास गेल्या तर मुले आपापल्या संसारात मग्न झाले़ वृध्द आई-वडिलांना वेगळे टाकून त्या चौघांनीही गावातच वेगळ्या चुली मांडल्या़ सहा वर्षापूर्वी सूर्यभान सरगर यांचे निधन झाले आणि रुक्मिणबाई सरगर एकट्या पडल्या़ डोक्यावर म्हणायला छत होते़ झोपडीत राहून आयुष्याच्या सायंकाळी त्या मोलमजुरी करुन आपले जीवन कंठित होत्या़
दोन वर्षापूर्वी त्यांनी वडवणी तहसील कार्यालयात निराधारांच्या यादीत नाव लावण्यासाठी अर्ज केला़ परंतु नाव काही लागलेच नाही़ खेटा मारुन त्या थकल्या़ शेवटी दोन वर्षानंतर त्यांच्या संघर्षाला फळ आले़ २५ जुलै रोजी याद्या अंतिम झाल्या़ या यादीत नाव आले की नाही याची खातरजमा करण्यासाठी रुक्मिणबाई तहसीलमध्ये मंगळवारी गेल्या अन् गर्दीत लागलेला धक्का त्यांच्या जीवावर बेतला़ डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला़
तहसीलदार एम़ जी़ जंपलवार म्हणाले की, आम्ही याद्या पाहण्यासाठी कोणालाही निमंत्रण दिले नव्हते़ तलाठ्यांमार्फत पत्रव्यवहार करुन नावे कळविली जाणार होती, असे त्यांनी सांगितले़
वडवणी तालुक्यातील कान्हापूर येथील रहिवासी असलेल्या रुक्मिणबाई सूर्यभान सरगर यांच्या आयुष्याची कथाच हृदय पिळवटून टाकणारी आहे़ आयुष्यभर मोलमजुरी करुन जगणाऱ्या रुक्मिणबाई यांना दोन विवाहित मुली व चार मुले आहेत़ मात्र ते सारेच संसारात मग्ऩ पती सूर्यभान यांचे सहा वर्षापूर्वी निधन झाले़ तेव्हापासून त्या निराधार होत्या़
रुक्मिणबाई सरगर या दोन वर्षांपासून वडवणीच्या तहसील कार्यालयामध्ये श्रावणबाळ योजनेंतर्गत निराधार योजनेचा लाभ मिळावा यासाठी खेटे मारत होत्या़
४श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची यादी तहसीलमध्ये लागल्याचे त्यांच्या कानावर आल्या आणि त्या मोठ्या अपेक्षेने मंगळवारी एकट्याच तहसील कार्यालयात गेल्या़
४यादीत नाव पाहण्यासाठी तेथे आधीच लाभार्थ्यांची झुंबड उडालेली होती़ अक्षरओळखही नसलेल्या रुक्मिणबाई सरगर यांनी गर्दीतून वाट काढत यादीजवळ पोहचण्याचा प्रयत्न केला़
४सुशिक्षित लाभार्थ्याला विचारुन त्या आपल्या नावाची खात्री करणार होत्या़ इतक्यात गर्दीमध्ये पाठीमागून त्यांना धक्का लागला अन् वयोवृध्द रुक्मिणबाई जागीच कोसळल्या़
४त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले़ परंतु बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांनी उपचारादरम्यान प्राण सोडले़