शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लातूर बाजार समितीचे संचालक मंडळ अखेर बरखास्त

By admin | Updated: November 13, 2014 00:52 IST

लातूर : मुदत संपूनही निवडणुका न होणाऱ्या जिल्हाभरातील आठ बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त होत आहेत. त्यातील लातूर बाजार समितीचे संचालक मंडळ बुधवारी बरखास्त

लातूर : मुदत संपूनही निवडणुका न होणाऱ्या जिल्हाभरातील आठ बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त होत आहेत. त्यातील लातूर बाजार समितीचे संचालक मंडळ बुधवारी बरखास्त करुन जिल्हा उपनिबंधक ए. एल. घोलकर यांनी स्वत: प्रशासक म्हणून पदभार घेतला. आता येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील आणखी सात बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमण्याच्या हालचाली चालू आहेत. लातूर बाजार समितीची मुदत संपून दोन वर्षे उलटली आहेत. परंतु संचालक मंडळाने दोन वेळा सहा-सहा महिन्यांची तर निवडणुका आणि इतर कारणांमुळे सहा-सहा महिन्यांच्या दोन वेळा मुदतवाढी मिळाल्या. आता मुदत संपूनही निवडणुका न झाल्याने जिल्हा उपनिबंधक ए. एल. घोलकर यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास विनियमन) अधिनियम १९६३ (१५ अ) (१) (अ) नुसार संचालक मंडळ बरखास्त करुन सायंकाळी पाच वाजता पदभार स्विकारला. यावेळी सभापती विश्वंभर मुळे, उपसभापती गायकवाड, सचिव मधुकर गुंजकर उपस्थित होते़ (प्रतिनिधी) ४जिल्ह्यातील दोन बाजार समित्यांवर यापूर्वीच प्रशासक नेमण्यात आले आहेत. यात औराद शहाजानी आणि चाकूर बाजार समित्यांचा समावेश आहे.जळकोट, रेणापूर, देवणी, निलंगा आणि शिरुर अनंतपाळ या बाजार समित्यांचे प्रशासकीय संचालक मंडळ गुरुवारी बरखास्त करुन प्रशासक नेमण्यात येणार आहेत. येत्या सहा महिन्यात जिल्ह्यातील आठही बाजार समित्यांच्या निवडणुकीची धुळवड रंगणार आहे. विधानसभा निवडणुकीत चमत्कार करणाऱ्या भाजपाचे पदाधिकारी आता बाजार समित्यांच्या राजकारणात कसा शिरकाव करतात आणि रिकामे झालेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपले वर्चस्व कसे सिध्द करतात याकडे डोळे आहेत.