शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा; केवळ ५ दिवसांचा साठा शिल्लक, रक्तदानाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:35 IST

खासगीत महिनाभराचा साठा, सरकारी रुग्णालयाची स्थिती चिंताजनक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील खासगी रक्त केंद्रांमध्ये सध्या १५ ते ३० दिवसांचा तर घाटी रुग्णालयातील विभागीय रक्त केंद्रांत केवळ ५ दिवस पुरेल इतका रक्तसाठा सध्या उपलब्ध आहे. उन्हाळ्याची सुरुवात, परीक्षेच्या कालावधीमुळे रक्तदानात घट झाली आहे. घाटीत दररोज रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे, शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

घाटी रुग्णालयात दररोज ७० ते १०० नवे रुग्ण भरती होतात. दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णांचाही भार घाटीतील विभागीय रक्त केंद्रावरच आहे. त्यामुळे याठिकाणी सर्वाधिक रक्ताची आवश्यकता असते; परंतु काही दिवसांपासून रक्तदान घटल्याने रक्तसाठ्यावर परिणाम झाला आहे. रक्ताचा तुटवडा दूर होण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

खासगी रक्त केंद्रांची स्थितीशहरात १३ रक्त केंद्रे आहेत. दत्ताजी भाले रक्तकेंद्राचे जनसंपर्क अधिकारी आप्पा सोमासे म्हणाले, सध्या एक महिना पुरेल इतका साठा आहे. एप्रिल, मे महिन्यात शिबिर होत नाही. आता रक्त संकलन होणे आवश्यक आहे. लायन्स ब्लड बँकेचे सोशल वर्कर श्यामराव सोनवणे म्हणाले, आमच्याकडे सध्या १५ ते २० दिवसांचा साठा आहे. अमृता ब्लड सेंटरचे विशाल जैन म्हणाले, आमच्या केंद्रात सध्या १०-१२ दिवसांचा साठा आहे.

रक्तदानासाठी पुढे यावेसध्या घाटीतील विभागीय रक्त केंद्रात ५ दिवस पुरेल इतका रक्त साठा आहे. रोज ७० ते ८० रुग्णांना रक्त दिले जाते. जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे- डाॅ. वैशाली नागोसे, प्रभारी विकृतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी

English
हिंदी सारांश
Web Title : Blood Shortage at Ghati Hospital; Urgent Appeal for Blood Donation

Web Summary : Ghati Hospital faces a critical blood shortage, with only a 5-day supply. Reduced donations due to summer and exams exacerbate the crisis. Authorities urge citizens to donate blood and organize camps to replenish stocks and help patients in need.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBlood Bankरक्तपेढी