शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

'शासनाकडून मदतीचे पाऊले नाहीत'; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी केली स्मशानात काळी दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 17:52 IST

ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट नुकसाभरपाई देण्याची वाहेगाव येथील शेतकऱ्यांची मागणी 

गंगापूर (औरंगाबाद): मराठवाड्यात परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले असून यामध्ये गंगापूर तालुक्यातील पिकांना देखील फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. शासन मात्र मदतीबाबत कोणतेच पाऊले उचलीत नसल्याने तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी स्मशानात दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध केला.

अतिवृष्टी व परतीच्या पावसाने तालुक्यातील खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. कापूस, तुर, मका, सोयाबीन आदी पिकांचा चिखल झाला आहे. यासाठी सरकारने जाहीर केलेली मदत तोकडी असून पंचनामे झालेले नसल्याने सदरील मदत दिवाळी पूर्वी मिळू शकली नाही. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असून खर्चाला पैसे नसल्याने वर्षातील सर्वात मोठा सण साजरा करता येत नाही, अशी अशी खंत व्यक्त करत वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी आज सकाळी गावच्या स्मशानभूमीत काळी दिवाळी साजरी केली. 

यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने सडलेला कांदा, कापूस, मका स्मशानभूमीत आणून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसाभरपाई, सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. या अनोख्या आंदोलनात अनंता भडके, नवनाथ मनाळ, शरद हिवाळे, लक्ष्मण गोरे, धनंजय चाफेकर, गोरखनाथ शिरसाट, नारायण मनाळ, ऋषिकेश मनाळ, राहुल पारखे, प्रकाश मनाळ, कल्याण मनाळ, ज्ञानेश्वर हिवाळे, पांडुरंग मनाळ, प्रल्हाद भडके,प्रभाकर हिवाळे, आनंद मनाळ, अमोल मनाळ, विठ्ठल शिंदे, राहुल कारभार आदी शेतकऱ्यांचा सहभाग होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagitationआंदोलनRainपाऊसDiwaliदिवाळी 2022