वैजापुरात नगराध्यक्षपदी भाजपच्या शिल्पा परदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 04:15 PM2018-04-12T16:15:14+5:302018-04-12T16:17:05+5:30

नगर पालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत शिवसेनेला धूळ चारली

BJP's Shilpa Pardeshi as the city president at Vaijapur | वैजापुरात नगराध्यक्षपदी भाजपच्या शिल्पा परदेशी

वैजापुरात नगराध्यक्षपदी भाजपच्या शिल्पा परदेशी

googlenewsNext

वैजापुर ( औरंगाबाद ) : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नगर पालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत शिवसेनेला धूळ चारली. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिल्पा दिनेश परदेशी यांनी शिवसेनेचे उमेदवार ताशफा अजहर अली यांचा २०७३ मतांनी पराभव केला.

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार शिल्पा परदेशी यांना ( १३९४६) तर शिवसेनेचे पराभूत उमेदवार सय्यद ताशफा अजहर अली यांना ( ११८७३) मते मिळाले. शिवाय भाजप, राष्ट्रवादी आघाडीचे २३ पैकी ९ नगरसेवकही भाजपचेच विजयी झाले. शिवसेना १३, कॉंग्रेसला केवळ १ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी व एमआयएमला या निवडणुकीत खाता ही उघडता आले नाही. नगर पालिकेसाठी ६ एप्रिल शुक्रवारी मतदान झाले. गुरुवार (दि.१२) सकाळी पंचायत समिती कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी दिड वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले.

नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार पक्ष व मिळालेले मतदान
१) शिल्पा दिनेश परदेशी ( भाजप) - १३९४६ विजयी 

नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार पक्ष व मिळालेले मतदान
१) सखाहरी लक्ष्मण बर्डे ( शिवसेना ) - ११२९

२) द्वारख़ाबाई  घाटे ( शिवसेना ) - १०२८

३) नंदाबाई त्रिभुवन ( शिवसेना ) -१४८८

४)शेख रियाज अकील  ( शिवसेना ) - १६१०

५) स्वपनिल जेजुरकर  ( शिवसेना ) - ११९०

६) अनीता तांबे ( भाजप ) - ११४५

७) शोभा विलास भुजबळ ( भाजप ) - १३३७

८) निलेश भाटिया ( शिवसेना ) - १३८३

९) सुप्रिया विनायक व्यवहारे ( शिवसेना) - १८४२

१०) साबेर खान ( शिवसेना ) - १८२६

११) शेख इम्रान रशीद (शिवसेना ) - ११६४

१२) ज्योती टेके (शिवसेना) - १४२५

१३) भोपळे प्रिती ( शिवसेना ) - १७१३

१४) शैलेश चव्हाण ( भाजपा) - १४९९

१५) गणेश खेरे ( भाजपा ) - १०८०

१६)लताबाई मगर ( भाजपा ) - ८७६

१७) मुमताजबी बिलाल ( शिवसेना ) - ८१७

१८) प्रकाश चव्हाण ( शिवसेना ) - ९२७

१९) माधुरी दशरत बनकर ( भाजप) - १३९६

२०) उल्हास ठोंबरे ( कॉंग्रेस) - १२५४

२१) संगीता गायकवाड़ ( भाजपा ) - २०७८

२२) दशरत बनकर ( भाजपा ) - १९८६

२३) जयश्री राजपूत ( भाजप) -१८०१

Web Title: BJP's Shilpa Pardeshi as the city president at Vaijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.