शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! गलांडे अध्यक्ष, तर जैस्वाल उपाध्यक्षपदी बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:43 IST

महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदही भाजपच्या ताब्यात!

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेच्या राजकारणात बुधवारी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. २०१७ च्या पराभवाचा वचपा काढत तब्बल ९ वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेवर आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. अध्यक्षपदासाठी वैजापूरचे अविनाश गलांडे आणि उपाध्यक्षपदासाठी फुलंब्रीचे जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मध्यरात्रीतून खेळलेल्या चालीमुळे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले.

महापालिकेनंतर जिल्हा परिषद काबीज करण्याचा चंग भाजपने बांधला होता. शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ३७ सदस्यांचा दावा केला होता. मात्र, मंत्री अतुल सावे यांनी हे आव्हान स्वीकारत रात्रीतून चक्रे फिरवली आणि विरोधकांची गोळाबेरीज वजाबाकीत बदलली. परिणामी, निर्णायक आकडा नसल्याचे स्पष्ट होताच शिंदेसेनेने बहिष्काराचा, तर ठाकरेसेनेने तटस्थ राहण्याचा मार्ग निवडला.

भाजपचा 'विजयी' आकडा६३ सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे स्वतःचे २३, अपक्ष २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४, प्रहार १, काँग्रेस १ असे एकूण ३१ सदस्य होते. सत्ता स्थापनेसाठी आकडा भाजपने सहज ओलांडला. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. या विजयामुळे जिल्ह्यात भाजपची पकड अधिक घट्ट झाली असून, महायुतीमधील 'मोठा भाऊ' कोण? हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP claims victory in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad election.

Web Summary : BJP secured control of Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad after nine years, electing Avinash Galande and Jitendra Jaiswal unopposed. Minister Atul Save's strategy outmaneuvered opponents, leading to a BJP majority with support from smaller parties. This solidifies BJP's dominance in the district.
टॅग्स :BJPभाजपाZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर