शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये मोठी उलथापालथ! दिग्गजांच्या पदरी निराशा, मराठवाड्यातून कार्यकारिणीत कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:47 IST

पुढील तीन वर्षे फारशा मोठ्या निवडणुका नसल्याने ही कार्यकारिणी केवळ पक्ष कार्यक्रम राबवण्यासाठी म्हणजेच 'कॅरिऑन ॲक्टिव्हर्स' म्हणून काम करेल, अशी चर्चा भाजप गोटात आहे.

छत्रपती संभाजीनगर : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी अनेक उलथा-पालथी केल्या. आ. संजय केणेकर यांना सरचिटणीसपदाची अपेक्षा होती; परंतु आमदार असल्यामुळे त्यांना संधी मिळाली नाही. संघटनमंत्री पदावरून सरचिटणीस होण्याची अपेक्षा असलेले संजय कौडगे यांची उपाध्यक्षपदावर बोळवण करण्यात आली. कौडगे यांच्या विरोधात मागील तीन वर्षांत अनेक तक्रारी होत्या, त्यामुळे त्यांनी संघटनेत दुय्यम दर्जाचे पद देण्यात आल्याचे दिसते आहे.

कौडगे यांनी छत्रपती संभाजीनगर मनपा पदाधिकारी निवडीत देखील ढवळाढवळ केल्याची चर्चा मध्यंतरी होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला राज्य कार्यकारिणीमध्ये कुठलेही महत्त्वाचे पद मिळालेले नाही. शिरीष बोराळकर यांना सरचिटणीसपद मिळेल, अशी चर्चा होती; परंतु त्यांनाही पक्षाने डावलले. मराठवाड्यातून उपाध्यक्षपदावर कौडगे यांच्यासह चैतन्यबापू देशमुख, अर्चना पाटील चाकूरकर, प्रवीण घुगे व रेखा कुलकर्णी यांची चिटणीसपदी वर्णी लागली. तसेच इद्रीस मुल्तानी यांची अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी, तर विश्वजित गायकवाड यांची एससी मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. एकूण ४३ जणांचा कार्यकारिणीत समावेश आहे. मराठवाड्यात एकही सरचिटणीस पद मिळालेले नाही. तीन उपाध्यक्ष व दोन चिटणीसपदांसह अल्पसंख्याक मोर्चा व एससी मोर्चा अध्यक्षपद मिळाले आहे.

संघटनमंत्री संघाच्या मुशीतील असेल...संघटनमंत्री पदावर संघाच्या मुशीतील पदाधिकारी असेल, असे बोलले जात आहे. अद्याप या पदावर कुणाची वर्णी लागलेली नाही. पुढच्या महिन्यात या पदावर नियुक्ती केली जाईल, असे भाजप सूत्रांनी सांगितले. तसेच २०२९ पर्यंत पक्षसंघटनेत फारसे काम नाही. किरकोळ निवडणुका वगळता संघटनेने दिलेले कार्यक्रम राबविण्याचाच मुख्य अजेंडा पुढील तीन वर्षांत असणार आहे, त्यामुळे ही कार्यकारिणी कॅरिऑन ॲक्टिव्हर्स अशीच असेल, अशी भाजप गोटात चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Major reshuffle in BJP! Disappointment for veterans, Marathwada representation revealed.

Web Summary : BJP's state executive saw a reshuffle, disappointing some leaders. Marathwada secured vice president and secretary positions. Organizational roles remain unfilled, with future focus on routine activities. The new team includes 43 members.
टॅग्स :BJPभाजपाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर