Video: महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा झालेल्या मैदानावर भाजपाकडून गोमुत्र शिंपण

By विकास राऊत | Updated: April 3, 2023 19:01 IST2023-04-03T19:01:03+5:302023-04-03T19:01:30+5:30

भाजपाकडून गोमुत्र शिंपून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

BJP sprinkled cow urine on the ground where the meeting of Mahavikas Aghadi was held | Video: महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा झालेल्या मैदानावर भाजपाकडून गोमुत्र शिंपण

Video: महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा झालेल्या मैदानावर भाजपाकडून गोमुत्र शिंपण

छत्रपती संभाजीनगर:महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा छ्त्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली. या मैदानावर आज दुपारी भाजपाकडून गोमुत्र शिंपून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

शहरातील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक विराट सभा घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली. त्याच मैदानावर उद्धव ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत आहेत. ही मोठी शोकांतिका आहे, यामुळे या मैदानास गोमुत्र शिंपून पवित्र करण्यात आल्याचे यावेळी भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सांगितले. यात सुहास दाशरथे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हर्षवर्धन कराड, ॲड.अमित देशपांडे, संजय फत्तेलष्कर, अमोल झळके, पवन सोनवणे, महेश मल्लेकर, अभय मगरे, सागर विसपुते, सचिन गुगले, ऋषी काथार आदींचा सहभाग होता. 

Web Title: BJP sprinkled cow urine on the ground where the meeting of Mahavikas Aghadi was held