शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिंदेसेनेचे एकमेकांविरोधात उमेदवार, युती म्हणजे केवळ 'थोतांड'; अंबादास दानवेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:54 IST

"जादुई आकडा नाही, मग महापौर कसा होणार?" अंबादास दानवे यांनी एमआयएमला विचारला जाब

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाचा सस्पेन्स वाढत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी एमआयएम आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. "ज्यांच्याकडे संख्याबळ नाही, ते महापौरपदाचे स्वप्न कसे पाहू शकतात?" असा सवाल करत त्यांनी एमआयएमच्या दाव्यातील हवा काढून घेतली आहे.

युती म्हणजे केवळ 'थोतांड' शहर आणि जिल्ह्यात भाजप-शिंदेसेना युती केवळ कागदावरच उरल्याचा दावा दानवे यांनी केला. "वरच्या नेत्यांनी युती केली असली, तरी खालच्या स्तरावर एकमेकांविरोधात 'एबी फॉर्म' देण्यात आले आहेत. ही युती म्हणजे निव्वळ थोतांड आहे," असे ते म्हणाले. महापौर कोणाचा होणार याच्याशी शिवसेनेचा संबंध नसल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने लोकशाहीचा कौल मानलाच पाहिजे.

नाशिक पोलीस आयुक्त आणि राणे कुटुंबीयांवर निशाणा नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या विधानाचा दाखला देत दानवे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन 'आऊट ऑफ द वे' जाऊन मदत करत आहे. दुसरीकडे, नितेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. "नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी उद्धव ठाकरेंना फोन केला होता आणि ठाकरेंनी ती परवानगी दिली होती. नितेश राणेंनी बालिशपणा थांबवावा," असा टोला त्यांनी लगावला.

मराठी महापौरासाठी मतं कुठे गेली? मीरा-भाईंदरमधील 'मराठी महापौर' या मागणीवरून त्यांनी मतदारांनाही खडे बोल सुनावले. "मतदान करताना मराठी उमेदवारांना डावलायचं आणि नंतर मराठी महापौर करा म्हणून मोर्चे काढायचे, याला काही अर्थ नाही. लोकांनी निवडून दिले असते तर आज ही वेळ आली नसती," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Shinde Sena Factions Clash; Alliance a Sham, Claims Ambadas Danve

Web Summary : Ambadas Danve criticizes the BJP-Shinde Sena alliance as a facade, citing internal clashes and conflicting candidate nominations. He also accuses the police of favoritism and rebukes Nitesh Rane's remarks. Danve questions the demand for a Marathi mayor in Mira-Bhayandar, pointing to voter choices.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAmbadas Danweyअंबादास दानवे