APMC Election Result Video: छत्रपती संभाजीनगरात भाजपा-शिंदे गटाचा दणदणीत विजय
By स. सो. खंडाळकर | Updated: April 29, 2023 12:51 IST2023-04-29T12:50:49+5:302023-04-29T12:51:09+5:30
भाजप- शिवसेना शिंदे गट पुरस्कृत पॅनलला स्पष्ट बहुमत; मविआला मोठा धक्का

APMC Election Result Video: छत्रपती संभाजीनगरात भाजपा-शिंदे गटाचा दणदणीत विजय
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण १५ पैकी ११ जागा भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त ४ जागांवर विजय मिळाला. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत पालकमंत्री संदीपन भुमरे, भाजपचे हरिभाऊ बागडे तर कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे हे ठाण मांडून बसले होते.
विजयी उमेदवार:
1) राधाकिसन देवराव पठाडे
2) श्रीराम भाऊसाहेब शेळके
3) गणेश सांडू दहीहंडे
4) भागचंद रुस्तुम ठोंबरे
5) अभिजीत भास्कर देशमुख
6) मुरलीधर पुंडलिक चौधरी
7) सुजाता मनोज गायके
8) जनाबाई ज्ञानेश्वर ठोंबरे
9) पूनमचंद सोनाजी बमणे
10) भागिनाथ रणुबा नवपुते
11) दत्ताभाऊ पांडुरंग ऊकर्डे
तर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचे 4 उमेदवार विजयी
1) जगन्नाथ वैजनाथ काळे
2) कैलास ज्ञानदेव ऊकर्डे
3) महेंद्र जनार्दन खोतकर
4) पठाण अब्दुल रहीम अब्दुल सलाम